जीव मुठीत घेऊन करत आहेत संसार; गोरेगावच्या सिद्धार्थनगर शिबिरातील वास्तव

By मनोहर कुंभेजकर | Published: August 14, 2023 12:47 PM2023-08-14T12:47:59+5:302023-08-14T12:48:33+5:30

सुमारे एक हजार नागरिकांवर टांगती तलवार असल्याचे जाणवते. 

they are doing the world with their lives in their fists reality in goregaon siddharth nagar camp | जीव मुठीत घेऊन करत आहेत संसार; गोरेगावच्या सिद्धार्थनगर शिबिरातील वास्तव

जीव मुठीत घेऊन करत आहेत संसार; गोरेगावच्या सिद्धार्थनगर शिबिरातील वास्तव

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सुमारे ४० वर्षांपूर्वी लालबाग, परळ, चिंचपोकळी, सायन येथून गोरेगाव पश्चिम सिद्धार्थनगर येथे ३८६ कुटुंब राहण्यास आली आणि कालांतराने इथलीच होऊन गेली. ते राहत असलेल्या म्हाडाच्या एक मजली संक्रमण शिबिराची सध्याची अवस्था पाहिली असता सुमारे एक हजार नागरिकांवर टांगती तलवार असल्याचे जाणवते. 

येथील ३८६ सदनिकांपैकी काही रिक्त असलेले आणि काही घूसखोरांनी कब्जा केलेले सुमारे ४०-५० गाळे २०१५ मध्ये म्हाडाने तोडले. विशेष म्हणजे या तोडलेल्या गाळ्यातील शिल्लक जागेत आजही काही कुटुंब जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.
ते वीज व पाण्याचे बिल नियमित भरतात, तसेच म्हाडाकडे दरमहा ५०० रुपये भाडेही भरतात. उद्या येथील इमारती कोसळून मोठी दुर्घटना घडल्यावर म्हाडा, सरकार जागे होणार का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे दिलीप शिंदे यांनी विचारला आहे.

येथील नागरिकांना गटार, दिवाबत्ती आणि स्वच्छतेची सुविधा मिळत नाहीत. गेली अनेक वर्षे आम्ही येथे राहतो. येथे पालिकेचा सफाई कर्मचारीही येत नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे. इमारतींचे स्लॅब पडले आहेत. पावसाळ्यात तळमजल्यावरील विद्युत मीटर केबिनमध्ये पाणी शिरून शॉर्टसर्किट होते. - तुळशीराम परब, रहिवासी.

येथील ११- ब इमारत तर वाकली असून, तर या इमारतीचे पिलर तुटलेले असून, इमारत क्रमांक १५ला तडे गेले आहेत. इमारत क्रमांक ४ ब, ५ ब, ६ ब व ७ ब ची अवस्था तर दयनीय आहे. कधीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. म्हाडाने नागरिकांचे जीव जाण्याअगोदर जातीने लक्ष द्यावे. - चारू गावडे, रहिवासी

१७ - ब इमारतीच्या मागे कचऱ्याचे ढीग, गटारांचे चेंबर तुटलेले असून, म्हाडा व पालिका याकडे दुर्लक्ष करते. आम्ही रहिवासी पैसे काढून येथील स्वच्छता करतो. म्हाडाचे अधिकारी येथे भेट देतात, पण दुर्लक्ष करतात. - सोनू शर्मा, रहिवासी.

 

Web Title: they are doing the world with their lives in their fists reality in goregaon siddharth nagar camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा