‘आदर्श’च्या प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी होणार
By Admin | Updated: August 24, 2014 02:01 IST2014-08-24T02:01:04+5:302014-08-24T02:01:04+5:30
बहुचर्चित आदर्श सोसायटी इमारत घोटाळय़ाप्रकरणी खासदार अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आरोपी करावे तसेच यातील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवावा,
‘आदर्श’च्या प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी होणार
मुंबई : बहुचर्चित आदर्श सोसायटी इमारत घोटाळय़ाप्रकरणी खासदार अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आरोपी करावे तसेच यातील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवावा, यासाठी दाखल झालेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी न घेता प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी घेणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आह़े
न्या़ पी़ व्ही़ हरदास यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आह़े प्रवीण वाटेगावकर, केतन तिरोडकर, सिंप्रीत सिंग यांनी यासाठी स्वतंत्र याचिका केल्या आहेत़ या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू होती़ मात्र यावर एकत्रित सुनावणी न घेता यातील प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी घेणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केल़े यासाठी याचिकाकत्र्यानी यापैकी कुठल्या मुद्दय़ावर प्रथम सुनावणी घ्यावी हे ठरवावे व त्याची माहिती न्यायालयाला द्यावी, असे आदेशही खंडपीठाने दिल़े पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी होईल.