Join us

धारावीसह अंधेरीत सोमवारी पाणी येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 02:39 IST

धारावीसह अंधेरीच्या काही भागात पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी दुरुस्तीच्या कालावधीत पाणी साठवून जपून वापरावे

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे पवई येथे तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ६ जून रोजी सकाळी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. ७ जून सकाळी १० वाजेपर्यंत जलवाहिन्याच्या दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत धारावीसह अंधेरीच्या काही भागात पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी दुरुस्तीच्या कालावधीत पाणी साठवून जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कालावधीत अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी, ट्रान्स रेसिडेंसी, सुभाषनगर, सरीपुतनगर, विजयनगर, पोलीस कॅम्प, मरोळ गावठाण, मिलिटरी रोड, भवानीनगर, चिमटपाडा, सगबाग, मकवाना रोड, ओमनगर, सहार गाव, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, इस्लामपूर, पारसीवाडा, चकाला गावठाण, जे.बी. नगर, मूळगाव डोंगरी, बामणवाडा, कबीरनगर, लेलेवाडी आणि टेक्निकल क्षेत्र येथे पाणीपुरवठा होणार नाही. याव्यतिरिक्त धारावीमधील प्रेमनगर, नाईकनगर, जासमिन मिल रोड, ९० फूट रोड, एम.जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास, काळा किल्ला, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी मेन रोड, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, ए.के.जी. नगर येथील पुरवठ्यावर परिणाम होणार नाही.

टॅग्स :मुंबईपाणी