सुमन नगरमध्ये दिवे लागले

By admin | Published: June 20, 2016 02:49 AM2016-06-20T02:49:53+5:302016-06-20T02:49:53+5:30

चेंबूरमधील सायन-पनवेल महामार्गावरून सुमन नगर व लाल डोंगर विभागांना जोडणाऱ्या मार्गावरील खांबांवर अखेर दिवे बसवण्यात आले आहेत

There were lamps in Suman Nagar | सुमन नगरमध्ये दिवे लागले

सुमन नगरमध्ये दिवे लागले

Next

मुंबई : चेंबूरमधील सायन-पनवेल महामार्गावरून सुमन नगर व लाल डोंगर विभागांना जोडणाऱ्या मार्गावरील खांबांवर अखेर दिवे बसवण्यात आले आहेत. येथील खांबांवर दिवे नसल्याने मार्गावर अंधार असतो. शिवाय त्याचा स्थानिकांना त्रास होतो, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध
केले होते.
या वृत्ताची दखल संबंधित प्रशासनाने घेत उचित कार्यवाही केल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘लोकमत’ने १८ जून रोजी यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत असतानाच त्याच दिवशी सायंकाळी संबंधित प्राधिकरणाने खांबावर दिवे बसवल्याने स्थानिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: There were lamps in Suman Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.