बाधित रहिवाशांचे पुनर्वसन तेथेच

By Admin | Updated: March 5, 2015 00:54 IST2015-03-05T00:54:38+5:302015-03-05T00:54:38+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या भुयारी मेट्रो मार्गामुळे अन्नपूर्णा इमारत, क्रांतीनगर, एकता निवास, धूतपापेश्वर इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर करण्यात येईल,

There was rehabilitation of the affected residents | बाधित रहिवाशांचे पुनर्वसन तेथेच

बाधित रहिवाशांचे पुनर्वसन तेथेच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या भुयारी मेट्रो मार्गामुळे अन्नपूर्णा इमारत, क्रांतीनगर, एकता निवास, धूतपापेश्वर इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर करण्यात येईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुन्हा दिली.
विधानभवनासमोरील सीआरटू इमारतीमध्ये बुधवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे आयोजित सार्वजनिक चर्चासत्रात गिरगावमधील या चार इमारतींमधील रहिवाशांची बाजू बुधवारी प्रथमत:च ऐकून घेण्यात आली. या वेळी गिरगावमधील अन्नपूर्णा इमारत, क्रांतीनगर, एकता निवास, धूतपापेश्वर इमारतीमधील एकूण ८० रहिवासी उपस्थित होते.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले की, मेट्रो ३ ची उभारणी करताना स्थानिक रहिवाशांचे आहे त्याच जागेवर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढले जाणार नाही.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कायमस्वरूपी अतिशय कमी जागेची गरज असून, ती स्थानकाच्या प्रवेश तथा निकास आणि अन्य काही सुविधा अशा साहाय्यक उपस्थानकावरील व्हेंटिलेशन शाफ्टसाठी आहे. या परिसरातील इमारती दाटीवाटीने उभ्या आहेत आणि जमिनीची कमतरता असल्याने स्थानक उभारणीसाठी काही इमारती पाडाव्या लागणार आहेत. परंतु मेट्रो ३ च्या जागेची गरज भागल्यानंतर त्याच ठिकाणी इमारतींची पुनर्बांधणी होऊ शकते काय? या शक्यतेची पडताळणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे पथक करणार आहे.
काळबादेवी आणि गिरगाव स्थानकाच्या प्रवेश तथा निकास आणि अन्य काही सुविधांसाठी मोकळी जागा आवश्यक आहे. प्रथम मोकळ्या जागेला तसेच सध्या सुरू असलेल्या अथवा प्रकियेत असलेल्या पुनर्बांधणी प्रकल्पातील जागांनाच प्राधान्य दिले जाईल, असेही कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)


च्त्याच जागेवर बाधित रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत कच्चा आराखडा तयार करील, असे आश्वासन या पथकाने रहिवाशांना दिले आहे.
च्मेट्रो ३ च्या जागेची गरज भागल्यानंतर त्याच ठिकाणी इमारतींची पुनर्बांधणी होऊ शकते काय? या शक्यतेची पडताळणी करणार आहे.

Web Title: There was rehabilitation of the affected residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.