आघाडीत विश्वासघात होऊ नये

By Admin | Updated: September 18, 2014 12:34 IST2014-09-18T02:56:29+5:302014-09-18T12:34:37+5:30

आमची अपेक्षा आह़े पण आघाडीही करायची आणि बंडखोरही उभे करायचे असे विश्वासघाताचे राजकारण होता कामा नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

There should be no betrayal in the front | आघाडीत विश्वासघात होऊ नये

आघाडीत विश्वासघात होऊ नये

मुख्यमंत्र्यांची अपेक्षा : प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी
औरंगाबाद : येत्या दोन-तीन दिवसांत आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. आघाडी करताना ती दोन्ही बाजूने प्रामाणिक व्हावी, अशी आमची अपेक्षा आह़े पण आघाडीही करायची आणि बंडखोरही उभे करायचे असे विश्वासघाताचे राजकारण होता कामा नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री चव्हाण शहरात आले होते. मुंबईला परत जाण्यापूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते. स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने 288 जागांची यादी दिल्लीला पाठविली काय, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की आघाडी व्हावी असे काँग्रेसचे प्रामाणिक मत आहे. 
जातीयवादी पक्षांना सत्तेपासून रोखण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे दिल्लीत आमची चर्चा सुरू आहे. त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असे दिसते. परंतु दुर्दैवाने तसा काही प्रसंग आलाच तर 
शेवटी काँग्रेस देशव्यापी मोठा पक्ष 
असून, सक्षमही आहे असा सूचक इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
 
काहींचे खातेवाटपही सुरू
च्युतीतील जागावाटपाची चर्चा संपलेली नसताना काहींनी तर खातेवाटपही सुरू केले आहे. 
च्जनतेचे प्रश्न, विभागाचे प्रश्न, महाराष्ट्राची पुढील दिशा यावर चर्चा 
न करता त्याऐजी खातेवाटप करण्याची घाई कसली, असा सवाल करत व्हॉट्सअॅपवरून माहिती घेऊन आयोग निर्माण करता येत नाही, 
असा चिमटाही मुख्यमंत्री चव्हाण 
यांनी काढला. 
 
महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरच : युती सरकारने 
आर्थिक खाईत बुडविलेले राज्य 1999 मध्ये मतदारांनी काँग्रेस आघाडीच्या हाती सोपविले. आम्ही राज्याची अर्थव्यवस्था प्रथम क्रमांकावर नेली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
 
मोदी सरकारचा सुरक्षेकडे कानाडोळा
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईला असणारा धोका स्पष्ट झाला असताना मोदी सरकारने राष्ट्रीय किनारपट्टी पोलीस संस्था गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात नेली. राज्य सरकारने यापूर्वीच पोलीस केंद्रासाठी पालघर येथल 305 एकर जमिनाला मंजुरी दिली होती. द्वारकेपेक्षा ही जागा पश्चिम किनारपट्टीसाठी मध्यवर्ती आणि सोयीची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

 

Web Title: There should be no betrayal in the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.