कळवा, मुंब्य्रात शुक्रवारी पाणी नाही
By Admin | Updated: January 14, 2015 23:10 IST2015-01-14T23:10:34+5:302015-01-14T23:10:34+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत शटडाऊन घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कळवा, मुंब्य्रात शुक्रवारी पाणी नाही
ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत शटडाऊन घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत शहरातील कोलशेत, बाळकुम, वागळे इस्टेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड व खारेगाव, मुंबई-पुणे रोड, मुंब्रा, कौसा आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)