धमकीच्या कॉलचा छडा अद्याप नाहीच!
By Admin | Updated: November 19, 2015 01:52 IST2015-11-19T01:52:37+5:302015-11-19T01:52:37+5:30
बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय नेते व अधिकारी यांची कसून चौकशी सुरू असतानाच परमार यांचा मुलगा अभिषेक (२४) याला

धमकीच्या कॉलचा छडा अद्याप नाहीच!
ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय नेते व अधिकारी यांची कसून चौकशी सुरू असतानाच परमार यांचा मुलगा अभिषेक (२४) याला धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे परमार कुटुंब धास्तावले आहे. कॉल येऊन २४ तास उलटले तरीही पोलिसांनी कुठलीच ठोस कारवाई केलेली नाही. सध्या संपूर्ण परमार कुटुंबाला पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.
अभिषेक यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन कंपनीवरील आरोपांचे खंडन केले होते. सुरज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील नगरसेवकांची नावे उघड झाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक यांना विशेष शाखेमार्फत संरक्षणही पुरविले आहे. सोमवारी दुपारी ३च्या सुमारास अभिषेकच्या मोबाइल फोनवर एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून ‘केस ज्यादा आगे मत चलाओ, वरना अंजाम बुरा होगा,’ अशा भाषेत त्यांना धमकावले. त्यानंतर अभिषेकने या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्याशी संपर्क साधला. मंगळवारी रात्री ८च्या सुमारास गुन्हा नोंदविल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)