रक्षाबंधनानिमित्त मेगाब्लॉक नाही
By Admin | Updated: August 9, 2014 23:58 IST2014-08-09T23:58:24+5:302014-08-09T23:58:24+5:30
रक्षाबंधनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी जाहीर केलेला मेगाब्लॉक मागे घेतला आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणा:या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रक्षाबंधनानिमित्त मेगाब्लॉक नाही
>मुंबई : रक्षाबंधनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी जाहीर केलेला मेगाब्लॉक मागे घेतला आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणा:या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. मात्र, रक्षाबंधनामिमित्त घराबाहेर पडणा:या लाखो मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने यापुर्वी जाहीर केलेला मेगाब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. अखेर शनिवारी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेला मेगाब्लॉक मागे घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने रक्षाबंधनाचा विचार करत शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्रीर्पयत मेगाब्लॉक घेतला होता.