डिमांड भरूनही दोन वर्षे वीज कनेक्शन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 23:46 IST2015-05-17T23:46:03+5:302015-05-17T23:46:03+5:30

शेतात वीज कनेक्शन देण्यासाठी ढाढरी येथील बाबु भिवा अकणे या शेतकऱ्याने दोन वर्षापूर्वी डीमांड भरले, मात्र त्याला ते देण्यासाठी टाळाळाट केली जात

There is no electricity connection for two years even after paying demand | डिमांड भरूनही दोन वर्षे वीज कनेक्शन नाही

डिमांड भरूनही दोन वर्षे वीज कनेक्शन नाही

जव्हार : शेतात वीज कनेक्शन देण्यासाठी ढाढरी येथील बाबु भिवा अकणे या शेतकऱ्याने दोन वर्षापूर्वी डीमांड भरले, मात्र त्याला ते देण्यासाठी टाळाळाट केली जात आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रीमहोदयांपर्यंत प्रकरण नेले तरीही महावितरणला जाग आली नाही.
जव्हार हा अतिदुर्गम आदिवासी तालुका आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहे. मात्र अधिकारी अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. बाबु अकणे यांनी सन २०११ मध्ये अर्ज केला. त्यानंतर सन २०१३ ला कनेक्शन मंजूर करून नविन तार जोडणीसाठी ६ हजार २६० रुपये भरण्याचे त्यांना सांगण्यात आले. ते त्यांनी १९ जून २०१३ रोजी भरले. मात्र कनेक्शन देण्यात आले नाही. याबाबत त्यांनी पालघर वितरण विभागाकडे तक्रार केली. तेथेही निराशा पदरी पडली. शेवटी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याकडे निवेदन दिले.
मंत्रीमहोदयांनी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे २५ फेब्रुवारी २०१५ रोजी आदेश दिले, परंतु अद्यापही वीज वितरण कंपनीने कनेक्शन जोडून दिले नाही.
(प्रतिनिधी)

Web Title: There is no electricity connection for two years even after paying demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.