अलिबागमध्ये बहुरंगी लढत
By Admin | Updated: October 2, 2014 22:45 IST2014-10-02T22:45:55+5:302014-10-02T22:45:55+5:30
अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपा, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष अशी बहुरंगी लढत रंगणार आहे.

अलिबागमध्ये बहुरंगी लढत
>आविष्कार देसाई - अलिबाग
अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपा, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष अशी बहुरंगी लढत रंगणार आहे. निवडणुकीतील प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मतदारराजा कोणाच्या पारडय़ात मतांचे दान टाकणार आहे, हे लवकरच समजणार आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये खरी लढत शेकाप-शिवसेना-काँग्रेस अशी तिरंगी होण्याची जास्त शक्यता आहे. 2क्क्9 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शेकाप आणि काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती. त्यावेळी शेकापच्या मीनाक्षी पाटील यांना 93 हजार 173, तर काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांना 59 हजार 25 मते मिळाली होती. 2क्क्9च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बॅ.ए.आर.अंतुले यांच्याविरोधात काँग्रेसचेच मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव अॅड. प्रवीण ठाकूर यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढविली होती. त्यामुळे अंतुले यांना अॅड. ठाकूर यांच्यामुळे सुमारे 38 हजार मतांचा फटका बसला होता. अंतुलेंच्या पराभवाची कारणो अनेक असली तरी, त्यातील हे एक कारण तितकेच महत्त्वाचे होते. त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली. त्यामुळे साहजिकच अंतुले समर्थक, मधुकर ठाकूर यांच्या विरोधातील काँग्रेसचा एक गट यांनी विधानसभेच्या निवडणुकीत ठाकूर यांच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे ठाकूर यांना पराभवाची चव चाखावी लागली हे सत्य लपलेले नाही. ठाकूर यांच्या मतांमध्ये शिवसेनेच्या मतांचाही वाटा होता. हे ही उघड सत्य असून शिवसेनेचे कार्यकर्ते ते मान्यही करतात. तसेच महेंद्र दळवी यांनीही ठाकूर यांना मदत केली होती. परंतु आताच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळे ठाकूर यांना ही लढाई सोपी नाही.
आघाडय़ा आणि युत्या टिकविण्याचे नाटय़ सुरु असताना शेकापचे पंडित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती, त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला. 2क्क्9 च्या निवडणुकीत मीनाक्षी पाटील यांना 93 हजार 73 मते मिळाली होती. शेकापची मते शेकापकडेच राहतात असा दावा शेकापचे नेते करतात. शेकापने 2क्14च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबतचा घरोबा तोडून स्वतंत्र उमेदवार उभा केला. त्यामुळे शिवसेना त्यांच्यावर प्रचंड नाराज झाली आहे. त्याचप्रमाणो शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या या भूमिकेवर शेकापतीलच बडे नेते नाराज झाले होते हेही तितकेच खरे आहे. कारण पनवेल, पेण यासह अन्य विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची शेकापला मदत व्हायची. त्याचप्रमाणो लोकसभेच्या निवडणुकीत शेकाप नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक केली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. त्यांच्या या राजकीय खेळीने सर्वच अवाक् झाले. सत्तेसाठी हे नेते काहीही करु शकतात हे जनतेर्पयत पोचले. त्यामुळे आता होणा:या विधानसभेच्या निवडणुकीत यांची छुपी युती नाही ना अशी संशयाची पाल सर्वसामान्यांच्या मनात चुकचुकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेकापच्या पारडय़ात मतदारराजा मतांचे दान कितपत टाकणार हे लवकरच कळणार आहे.
महेंद्र दळवी यांना तटकरे यांनी अध्यक्षपद न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेने अलिबागमधून उमेदवारीही दिली आहे.
दळवी यांच्या पाठीशी सहानुभूती
1महेंद्र दळवी यांना सुनील तटकरे यांनी अध्यक्षपद न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेने अलिबागमधून उमेदवारीही दिली आहे. तटकरे यांनी स्वार्थी राजकारण करीत दिलेला शब्द पाळला नाही. याची सहानुभूती दळवी यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे.
2काँग्रेसमधील नाराज असणारा एक गट दळवी यांच्या सोबत राहणार असा दावा दळवी यांनी केला होता. तसेच शिवसेनेला येथे मिळत असलेले पोषक वातावरण, शिवसेनेकडे ओढला जाणारा तरुणवर्ग ही समीकरणो शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
3काँग्रेसमधील नाराज असणारा एक गट दळवी यांच्या सोबत राहणार असा दावा दळवी यांनी केला होता. तसेच शिवसेनेला येथे मिळत असलेले पोषक वातावरण, शिवसेनेकडे ओढला जाणारा तरुणवर्ग ही समीकरणो शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
4आघाडय़ा आणि युत्या टिकविण्याचे नाटय़ सुरु असताना शेकापचे पंडित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. 2क्क्9 च्या निवडणुकीत मिनाक्षी पाटील यांना 93 हजार 73 मते मिळाली होती. शेकापची मते शेकापकडेच राहतात असा दावा शेकापचे नेते करतात. शेकापने 2क्14च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबतचा घरोबा तोडून स्वतंत्र उमेदवार उभा केला.