वालीव येथे आठ गाळे खाक
By Admin | Updated: May 8, 2015 00:13 IST2015-05-08T00:13:58+5:302015-05-08T00:13:58+5:30
वालीव-धुमाळमधील शुभम इंडस्ट्रीजला गुरुवारी लागलेल्या आगीत आठ गाळे खाक झाले. अग्निशमन दल तसेच नागरिकांच्या सहकार्याने आगीवर

वालीव येथे आठ गाळे खाक
पारोळ : वालीव-धुमाळमधील शुभम इंडस्ट्रीजला गुरुवारी लागलेल्या आगीत आठ गाळे खाक झाले. अग्निशमन दल तसेच नागरिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण कळू शकले नाही.
शुभम इंडस्ट्रीजमध्ये खालच्या गाळ्यामध्ये फर्निचर तर वरच्या गाळ्यात मिठाईचे बॉक्स बनविण्याची कंपनी आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास फर्निचरला आग लागली त्यानंतर वरच्या गाळ्यातील कागदानेही पेट घेतला. क्षणातच आगीने भयंकर रुप धारण केले. प्रसंगवधान राखून कामगार बाहेर पडले. उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाण्याचे टँकर तसेच अग्निशमन दलाला पाचारण केले. यात मोठे नुकसान झाल्याचे समजते. (वार्ताहर)