मुंबईत फेरीवाल्यांना संरक्षण आहे का?

By Admin | Updated: August 2, 2015 03:37 IST2015-08-02T03:37:33+5:302015-08-02T03:37:33+5:30

केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलेले संरक्षण मुंबईत लागू होते की नाही, लागू होत असल्यास त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार याचा खुलासा करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत.

Is there any protection for hawkers in Mumbai? | मुंबईत फेरीवाल्यांना संरक्षण आहे का?

मुंबईत फेरीवाल्यांना संरक्षण आहे का?

मुंबई : केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलेले संरक्षण मुंबईत लागू होते की नाही, लागू होत असल्यास त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार याचा खुलासा करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत.
या प्रकरणी जनहित मंचने जनहित याचिका केली आहे. केंद्र सरकारने कायदा करून फेरीवाल्यांना दिलेले संरक्षण मुंबईलाही लागू होते का, असा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. १ मे २०१४ रोजी केंद्र सरकारने या कायद्याची अधिसूचना जारी केल्याचे महापालिकेने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने हा कायदा मुंबईला लागू आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या कायद्याअंतर्गत फेरीवाल्यांना रस्त्यावर किंवा पदपथावर अधिकृत जागा दिली जाते. यासाठी मध्यंतरी महापालिकेने नोंदणीही सुरू केली.
मात्र या कायद्याच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा प्रश्न न्यायालयाने केल्याने हा कायदा कोणत्या फेरीवाल्यांना व कधीपासून लागू होणार हा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे सोमवारी शासन काय भूमिका मांडणार व त्यावर न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Is there any protection for hawkers in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.