Join us  

सत्तेसाठी ‘आयाराम’ हवेच; पण त्यांना २० टक्केच पदे ! पक्षांतराचे दानवेंकडून समर्थन

By यदू जोशी | Published: March 21, 2019 6:13 AM

भाजपामध्ये आजही ८० टक्के पदे ही निष्ठावंतांनाच दिली जातात. बाहेरून आलेल्यांना फारतर २० टक्के पदे दिली जातात. सत्तेचं राजकारण करायचं तर अन्य पक्षातील लोकांना आणणे आवश्यक आहे

- यदु जोशी मुंबई : भाजपामध्ये आजही ८० टक्के पदे ही निष्ठावंतांनाच दिली जातात. बाहेरून आलेल्यांना फारतर २० टक्के पदे दिली जातात. सत्तेचं राजकारण करायचं तर अन्य पक्षातील लोकांना आणणे आवश्यक आहे, असे समर्थन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.डॉ. सुजय विखे यांना भाजपात घेऊन लगेच खासदारकीची उमेदवारी देणे हा विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यावर अन्याय नाही का?दिलीप गांधी पक्षाचे नेते आहेत. निष्ठावंत तर आहेतच. एखाद्या निवडणुकीत संधी मिळाली नाही म्हणून लगेच अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात राखला जाईल. कालपर्यंत भाजपावर सडकून टीका करणारे डाँ.  सुजय विखे रणजितसिंह मोहिते यांना रात्रीतून पवित्र करून घेण्याचे कारण काय? कालपर्यंत आमच्यावर टीका करणारे आज आमचे मित्रपक्ष (शिवसेना) आहेतच ना ! गमतीचा भाग जाऊ द्या; पण  काँग्रेसमधील दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतल्या तरुण नेत्यांचा त्यांच्या पक्षाविषयी भ्रमनिरास झाला आहे. तसेच विरोधात असताना त्यांनी आमच्याविरुद्ध बोलणे अपेक्षितच आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीने प्रभावित झालेले हे तरुण नेते आज भाजपात येत आहेत. त्यांना भाजपात राजकीयदृष्ट्या सुरक्षित वाटते. त्यांना नाकारण्याचे कारण नाही.भाजपात बाहेरुन आलेल्यांचा सन्मान होतो पण गेल्यावेळी ३० पेक्षा जास्त बाहेरून आलेले आमदार झाले, त्यांच्यापैकी कोणालाही मंत्री का केले नाही?भाजपाचे आमदार म्हणून ही त्यांची पहिलीच टर्म होती. आता ते पक्षात रुळले आहेत. त्यांच्यापैकी काहींना पदे देता आली. भविष्यात संधी आहेच.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर महामंडळांवर काही जणांची वर्णी लावण्यात आली. त्यांना उणेपुरे तीन महिनेही पदे भोगायला मिळणार नाहीत. या निर्णयाने पक्षाचे कुठले हित साधले?अशा नियुक्त्या झालेल्या नाहीत. ‘तुमच्या नावाचा विचार केला जात आहे’ असे पत्र आम्ही त्यांना दिले आहे.जालनामध्ये तुम्हाला पराभवाची भीती होती म्हणून राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना इतके गोंजारणे सुरु होते का?गोंजारण्याचा प्रश्न येतो कुठे? ते युतीमध्ये आहेत. निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते कुठेही जाणार नाहीत याची मला खात्री होतीच. त्यांनी दरवेळी त्यांनी मला मदत केली आणि आम्हीही ते युतीचे उमेदवार असताना मनापासून मदत केलेलीच आहे. आता वाद संपला!जिथे ताकद कमी, तिथे बाहेरचे घेतो जिथे आमच्या पक्षाची ताकद कमी असते तिथे आम्ही बाहेरच्यांना घेतो. त्यांना घेऊन सत्तेचं गणित जमतं. त्यांना घेतल्याने निष्ठावंतांवर अन्याय होण्याचा प्रश्नच नाही.- रावसाहेब दानवे,प्रदेशाध्यक्ष, भाजपा 

टॅग्स :रावसाहेब दानवेमराठवाडा