...तर तो विकास आराखडा चुलीत घालू
By Admin | Updated: March 4, 2015 02:12 IST2015-03-04T02:12:06+5:302015-03-04T02:12:06+5:30
मुंबईच्या विकासाची नवीन व्याख्या मांडणाऱ्या नवीन विकास आराखड्याच्या विरोधात भूमिका घेऊन शिवसेनेने मित्रपक्ष भाजपाला आज थेट आव्हान दिले़
...तर तो विकास आराखडा चुलीत घालू
मुंबई : चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मुंबईच्या विकासाची नवीन व्याख्या मांडणाऱ्या नवीन विकास आराखड्याच्या विरोधात भूमिका घेऊन शिवसेनेने मित्रपक्ष भाजपाला आज थेट आव्हान दिले़ या आराखड्यातून बिल्डरांची धन करणार असला तर शिवसेना तो चुलीत घालेल, असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे़ यामुळे युतीमध्ये वादाच्या विकासाची चिन्हे आहेत़
सन २०१४-२०३४ या २० वर्षांकरिता मुंबईच्या विकास आराखड्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे़ यामध्ये मुंबईतील एफएसआय आठपर्यंत वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे़ मात्र या आराखड्याचे गोडवे भाजपातून गायले जात असताना शिवसेनेने मात्र बंडाचा झेंडा फडकविला आहे़ यावर पक्षाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत आज स्पष्ट केली़ या बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार, नगरसेवक उपस्थित होते़ या वेळी ठाकरे यांनी यूएलसी कायद्याच्यावेळी पक्षाला एकटे पाडण्यात आल्याची आठवण करून दिली़ मुंबई बिल्डरांच्या घशात घालणार असाल, तर एफएसआयचे नाटक चालू देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे़ (प्रतिनिधी)
च्विकास आराखड्यातील तरतुदी तांत्रिक असल्याने सर्वसामान्यांना कळून येत नाहीत़ त्यामुळे समजेल अशा भाषेत विकास आराखडा तयार करा, अशी सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केली आहे़ तसेच दर सोमवार आणि शनिवार संध्या़
४ ते ६ या वेळेत शिवसेना भवनात विकास आराखडा तज्ज्ञांकडून समजावून देण्यात येईल़ यावर सूचना व हरकती कशा नोंदवाव्या, यावरही धडे देण्यात येणार आहेत़
च्दिल्ली, अहमदाबादचे महत्त्व वाढवताय : दादर, अंधेरी अशा प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर आठ एफएसआयपर्यंत विकासाला अनुमती देण्यात येणार आहे़ मात्र दादरला आठ एफएसआय तर रस्त्याला किती? खारफुटीचाही विकास करताय, यावर ठाकरे यांनी आक्षेप घेतला़
च्पालिकेने भीक मागायची काय? जकात उत्पन्न पुढच्या वर्षीपासून बंद होऊन वस्तू व सेवाकर लागू होणार आहे़ जकातीमधून पालिकेला दरवर्षी साडेसात हजार कोटींचे उत्पन्न मिळते़ हे उत्पन्नच बंद झाल्यावर पालिकेने भीक मागायची काय, असा जाब ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे़
च्विकास आराखड्यातून मुंबईचा विकास होणार असल्याचे चित्र रंगविण्यात येत आहे़ मात्र दुसरीकडे दिल्ली आणि अहमदाबादचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला़