- सुजित महामुलकरमुंबई - आशाताईंच्या निधनाची बातमी रविवारी कळताच मन सुन्न झाले, कुठेच लक्ष लागत नव्हते आणि जेवणही जात नव्हते. अखेर अंत्यदर्शनाची तीव्र इच्छा बाळगून शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचले. डोळ्यांत अश्रू आणि मनात दर्शन होईल की नाही, याची भीती. अखेर तब्बल तीन तासांनी अंत्यदर्शन झाले. आज अंत्यदर्शन झाले नसते तर आयुष्यभर मनाला रुखरुख लागून राहिली असती, अशी भावना गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमधील संकल्प सिद्धी मंदिरच्या पुजारी मीनाक्षी प्रभुघाटे यांनी व्यक्त केली.
चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ मीनाक्षी या जवळपास तीन तास प्रतीक्षा करत बसून राहिल्या. मात्र, पोलिसांकडून स्मशानभूमीकडे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नव्हता; फक्त व्हीआयपी, पोलिस आणि माध्यम प्रतिनिधींनाच आत सोडले जात होते. पार्थिव वाहनातून येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या वीर सावरकर मार्ग येथे जाऊन उभ्या राहिल्या.
मात्र, नंतर पार्थिव सूर्यवंशी हॉलच्या रस्त्याने स्मशानभूमीकडे पोहोचल्याचे समजताच चाहत्यांनी त्या दिशेने धाव घेतली. तिथेही पोलिसांनी सुमारे २००-२५० मीटर आधीच अडवले. वाढत्या गर्दीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर जनतेच्या वाढत्या दबावामुळे काही वेळासाठी सामान्यांना प्रवेश देण्यात आला. मीनाक्षी यांनी ही संधी साधत आत प्रवेश मिळवला आणि आशाताईंचे अंत्यदर्शन घेतले.
लहानपणापासून आशाताईंच्या आवाजाची चाहती“मी लहानपणापासून, साधारण दहा - अकराव्या वर्षापासून त्यांच्या आवाजाची चाहती आहे. त्यांच्या गाण्यांनी नेहमीच मन भारावून जाते, ताण कमी होतो आणि दुःख विसरायला मदत होते. आजही मी एफएम रेडिओवर गाणी ऐकते. सकाळी त्यांच्या लोअर परळ येथील घरी दर्शनासाठी जाणार होते. पण, जमले नाही. त्यानंतर मात्र, मला राहावेना. मागचा - पुढचा विचार न करता निघाले, असे मीनाक्षी प्रभुघाटे यांनी सांगितले.
Web Summary : A Goregaon priest, a lifelong Asha Bhosle fan, felt immense relief after finally seeing her mortal remains at Shivaji Park crematorium, fearing lifelong regret if she missed it.
Web Summary : गोरेगांव की एक पुजारी, आशा भोसले की आजीवन प्रशंसक, शिवाजी पार्क श्मशानभूमि में उनके पार्थिव शरीर के अंतिम दर्शन कर बेहद खुश हुईं, उन्हें डर था कि अगर वह चूक जाती तो उन्हें जीवन भर पछतावा होता।