Join us  

... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करू, राऊतांनी सांगितलं सत्ताबदलाचं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 4:59 PM

सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे.

ठळक मुद्देसत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे.

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताबदलासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरात पोहोचले आहेत. त्या, पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, सरकार पाडण्याचं माझ्यावर सोडा, असेही त्यांनी म्हटलं.

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या वक्तव्याला राऊत यांनी प्रत्युत्तर देताना, सरकार पाडल्यानंतर आम्ही तुमचं अभिनंदन करू, असे म्हटलंय. 

सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला अशी भाषणं करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणं केलेली आहेत, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी, त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटलंय. या काळात सरकार पडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार हे, जेव्हा ते पाडतील तेव्हा त्यांचं अभिनंदन करू, असेही राऊत यांनी म्हटलंय.

फडणवीसांची सरकारवर टीका

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही. निवडणूक आली की कोणता तर बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली आहेत. कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही. जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळवून देऊ पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पध्द्तीने वीज बिलाची शेतकऱ्यांकडून वसुली केली. लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते त्यांना दुप्पट बिले देऊन आपली तिजोरी भरली, विजेची थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कट केली त्यांची ट्रान्स्फर उचलून नेल्याचे पाप यांनी केल्याचेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंजय राऊतशिवसेनाराजकारणपंढरपूरनिवडणूक