...तर आरे कॉलनीचे दुसरे धारावी होईल

By Admin | Updated: March 13, 2015 01:18 IST2015-03-13T01:18:27+5:302015-03-13T01:18:27+5:30

अर्धवट माहितीच्या आधारे विकास नियोजन आराखड्यावर टीका केली जात आहे़ आरे कॉलनीच्या विकासाचा मुद्दा सोडला, तर तिथे दुसरे गणपत पाटील नगर

... then the Aarey Colony's second Dharavi will be | ...तर आरे कॉलनीचे दुसरे धारावी होईल

...तर आरे कॉलनीचे दुसरे धारावी होईल

मुंबई : अर्धवट माहितीच्या आधारे विकास नियोजन आराखड्यावर टीका केली जात आहे़ आरे कॉलनीच्या विकासाचा मुद्दा सोडला, तर तिथे दुसरे गणपत पाटील नगर व धारावी उभी राहणार नाही़ हा हरित पट्टा सुरक्षित राहील, याची हमी कोणी देऊ शकता का, असा सवाल करीत विकास आराखड्यावर आरोप करणाऱ्या शिवसेना-मनसेला खरमरीत प्रत्युत्तर आयुक्त सीताराम कुंटे यांनी आज दिले़
मुंबई फर्स्ट या संस्थेमार्फत विकास नियोजन आराखड्यावर प्रेस क्लबमध्ये चर्चासत्र ठेवण्यात आले होते़ या चर्चासत्रात टाटा रिअ‍ॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय उबाळे आणि नगरविकास आराखड्याचे सल्लागार व्ही़ फाटक उपस्थित होते़ एफएसआय, आरे कॉलनीचा विकास आणि मोकळ्या जागेबाबत निर्माण झालेल्या वादांवर या वेळी आयुक्तांनी आपली भूमिका मांडली़
तसेच बिल्डरांच्या हिताचा आराखडा चुलीत टाका, अशी म्हणणारी शिवसेना आणि
मराठी माणसाला हद्दपार करणारा आराखडा, असा आरोप करणाऱ्या मनसेचा आयुक्तांनी या वेळी समाचार घेतला़
हा आराखडा बिल्डरांच्या हिताचा, महाराष्ट्रविरोधी, मराठी माणसाला हद्दपार करणारा असे आरोप होत आहेत. मात्र हा आराखडा सर्वांसाठी असून अभ्यास करा आणि मग बोला, असे आयुक्तांनी टीकाकारांना ठणकावले आहे़ दुग्धविकास खाते, म्हाडा वसाहती, पाम रिसॉर्ट, फिल्म स्टुडिओच्या रूपाने आरेमध्ये विकास सुरूच आहे़ यापुढेही हा विकास होत राहिला तरी तुमच्या लक्षात येणार नाही, असा टोला आयुक्तांनी लगावला़
विकासाचा एक पर्याय
विकासासाठी द्वार उघडताच बिल्डरांचे प्रस्ताव धडाधड येऊ लागतील, असा त्याचा अर्थ होत नाही़ आरे कॉलनीतील मोठा भाग केवळ वन व हिरवळीने व्यापलेला आहे़ त्या ठिकाणी थीम पार्क, संस्था, स्पोटर््स संकुल सुरू करू शकतो़ आयआयटीनंतर मुंबईत जागेअभावी दुसरी राष्ट्रीय संस्था येऊ शकली नाही़ आरेच्या विकासामुळे अशा संस्थांना स्थान मिळेल व नागरिकांसाठीही हा मोकळा भूखंड खुला होईल़ मात्र हा विकास आराखड्यातून सुचविलेला एक पर्याय आहे़ यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेता येईल, असे आयुक्तांनी सुनावले़

Web Title: ... then the Aarey Colony's second Dharavi will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.