चार महिन्यांत हजार वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST2021-06-16T04:07:33+5:302021-06-16T04:07:33+5:30

अवघ्या ४०५ वाहनांचा शोध, दिवसाला ७ ते ८ वाहने चोरीला चार महिन्यांत हजार वाहनांची चोरी अवघ्या ४०५ ...

Theft of a thousand vehicles in four months | चार महिन्यांत हजार वाहनांची चोरी

चार महिन्यांत हजार वाहनांची चोरी

अवघ्या ४०५ वाहनांचा शोध, दिवसाला ७ ते ८ वाहने चोरीला

चार महिन्यांत हजार वाहनांची चोरी

अवघ्या ४०५ वाहनांचा शोध; दिवसाला ७ ते ८ वाहने चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ ओढावली. अशात, दिवसाला ७ ते ८ वाहने चोरीला जात असल्यामुळे मुंबईकरांच्या डोकेदुखीत भर पडत आहे. यात, गेल्या चार महिन्यांत मुंबईतून १ हजार ९८ वाहने चोरीला गेली आहेत. यातील अवघ्या ४०५ वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले.

यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात मुंबईत एकूण १९ हजार २१२ गुन्हे नोंद झाले. यापैकी १४ हजार ६५३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. गेल्या वर्षी हाच आकडा १६ हजार ५१८ होता. गेल्या वर्षी लॉकडाऊनचे सुरुवातीच्या मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच जूनपासून गुन्ह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरूपात आले. यात वाहनचोरीत वाढ झाली आहे.

यावर्षी एप्रिलपर्यंत १ हजार ९८ वाहने चोरीला गेली आहेत. यापैकी अवघ्या ४०५ वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या याच चार महिन्यांच्या तुलनेत यात, ३७३ने वाढ झाली आहे.

* भंगारात पार्टची विक्री, तर कुठे बनावट क्रमांकाच्या आधारे विक्री

रस्त्यालगत उभ्या असलेली दुचाकी, चारचाकी वाहने चोरून काही टोळी त्यांच्या पार्टची मुंबईसह मुंबईबाहेर विक्री करतात. मुंबईतही बऱ्याच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात. तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजिन नंबर लावत त्यांची विक्री करतात. भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायच्या. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायची. अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. तर काही ठग बनावट क्रमांक लावून या दुचाकीची सोशल मीडियावरही विक्री करताना दिसून आले.

....................................................

Web Title: Theft of a thousand vehicles in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.