रायगडमधील चोरीचा पर्दापाश
By Admin | Updated: December 9, 2014 22:37 IST2014-12-09T22:37:17+5:302014-12-09T22:37:17+5:30
एका महिलेच्या मंगळसूत्र चोरीप्रकरणातून चोरटय़ा पती-पत्नीचा पर्दापाश झाला असून त्या चोरटय़ांच्या घरातून लाखोच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे.

रायगडमधील चोरीचा पर्दापाश
गोरेगाव : एका महिलेच्या मंगळसूत्र चोरीप्रकरणातून चोरटय़ा पती-पत्नीचा पर्दापाश झाला असून त्या चोरटय़ांच्या घरातून लाखोच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात माणगाव पोलिसांना यश आले आहे.
तळे येथील एका 4क् वर्षाच्या महिलेला रस्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून मोटारसायकलवरुन पळून जाणा:या चोरांना माणगाव पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. चोरीची घटना घडताच महेश येरुणकर आणि भावना येरुणकर या दाम्पत्याला जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशीदरम्यान अन्य ठिकाणीही त्यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे, पो. नि. शिंदे यांनी आपल्या पथकासह या दाम्पत्याच्या माणगाव शहरातील निजामपूर रोडवर असलेल्या घरावर छापा मारला. अटक केलेल्या येरुणकरचे घर म्हणजे अलिबाबाची गुहा असल्याचे वास्तव समोर आले. माणगाव पोलिसांनी रविवारी या दाम्पत्याच्या घराची झडती घेतली, त्यावेळी त्यांनी चोरलेला लक्षावधी रुपयांचा ऐवज घरामध्ये आढळून आला.
सोमवारी दिवसभर या ऐवजाची मोजदाद सुरु होती. प्राथमिक अंदाजानुसार हा ऐवज पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा असण्याची शक्यता माणगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दाम्पत्याच्या घरी सोन्याचे नाग, सोन्या-चांदीच्या मूर्ती, दानपेटय़ांसह शेकडो मौल्यवान वस्तू आढळून आल्या. त्यांनी जिल्हय़ात केलेल्या विविध चो:या उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून 11 डिसेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.