जप्त केलेल्या १८ लाखांच्या सिगारेटची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:52+5:302021-02-05T04:23:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : जीएसटीच्या अहमदाबाद युनिटने जप्त केलेल्या १८ लाख २२ हजार किमतीच्या सिगारेटची उद्योग विहारमधील सीलबंद ...

जप्त केलेल्या १८ लाखांच्या सिगारेटची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : जीएसटीच्या अहमदाबाद युनिटने जप्त केलेल्या १८ लाख २२ हजार किमतीच्या सिगारेटची उद्योग विहारमधील सीलबंद गाळ्यातून चोरी झाली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग १चे अधिकारी करीत आहेत. विभागाला आतापर्यंत एकाला अटक करण्यात यश आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ३ येथील उद्योगविहारमधील गाळा नं. २ मध्ये १८ लाख २२ हजार किमतीच्या सिगारेटचा साठा ९ व १० मार्च, २०२० दरम्यान डायरेक्टर जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इंटेलिजन्स झोनल (जीएसटी) युनिट अहमदाबाद यांनी जप्त करून सीलबंद केला. दरम्यान, १३ एप्रिल, २०२० रोजी गाळ्यातील जप्त व सीलबंद केलेल्या सिगारेटची चोरी झाल्याचे उघड झाले. गाळामालक व फिर्यादी जितेंद्र माखेजा यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे तक्रार दाखल झाली नसल्याची प्रतिक्रिया ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. या चोरीप्रकरणी प्रणय तिडके याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांनी दिली.