दुकानाचे छप्पर तोडून २८ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:09 IST2021-08-20T04:09:38+5:302021-08-20T04:09:38+5:30

मुंबई : शॉर्टसर्किटच्या भीतीने दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. त्याचा फायदा घेत खारमध्ये दुकानाचे छप्पर तोडून चोरांनी २८ लाखांची ...

Theft of Rs 28 lakh by breaking the roof of the shop | दुकानाचे छप्पर तोडून २८ लाखांची चोरी

दुकानाचे छप्पर तोडून २८ लाखांची चोरी

मुंबई : शॉर्टसर्किटच्या भीतीने दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. त्याचा फायदा घेत खारमध्ये दुकानाचे छप्पर तोडून चोरांनी २८ लाखांची रोकड लंपास करत पळ काढला. याप्रकरणी खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

खारच्या एस. व्ही. रोड परिसरात मतीन कपाडिया यांचे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंचे दुकान आहे. या दुकानाच्या छपरावरून एसीच्या उघड्या खिडकीतून चोर दुकानात शिरले. त्यानंतर त्यांनी दुकानातील २८ लाख घेऊन पळ काढला. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, पावसामुळे त्याचे शॉर्टसर्किट होऊन अप्रिय घटना घडू नये, यासाठी कपाडिया यांनी ते बंद केले. त्यामुळे त्यांचे चित्रीकरण त्यात कैद झाले नाही. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: Theft of Rs 28 lakh by breaking the roof of the shop