पत्र्याच्या गॅपमधून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:10 IST2021-09-02T04:10:48+5:302021-09-02T04:10:48+5:30
मुंबई : देवनार येथील एका लोखंडी सामान ठेवणाऱ्या गोडावूनच्या पत्र्याच्या गॅपमध्ये शिरुन चोरांनी ५२ हजार रुपयांच्या ऐवजावर हात ...

पत्र्याच्या गॅपमधून चोरी
मुंबई : देवनार येथील एका लोखंडी सामान ठेवणाऱ्या गोडावूनच्या पत्र्याच्या गॅपमध्ये शिरुन चोरांनी ५२ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला आहे. सोमवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवत देवनार पोलीस अधिक तपास करत आहेत.
.....
बनावट चावीच्या आधारे दुकानात चोरी
मुंबई : पायधुनी येथील बेअरिंग विक्रीच्या दुकानात बनावट चावीच्या आधारे चोरी झाल्याची घटना रविवारी घडली. यामध्ये अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सीसीटीव्हीमध्ये ३ चोर कैद झाले आहेत. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
....
घाटकोपरमध्ये घरफोडी
मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील एका घराचे कुलूप तोडून १७ हजार रुपयांची चोरी केली आहे. सासऱ्यांचे निधन झाले म्हणून घरातील मंडळी गावी असताना ही चोरी झाली आहे. याप्रकरणी २८ ऑगस्ट रोजी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
....