केमिकल कंपनीच्या गोपनीय अहवालाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:06 IST2020-12-22T04:06:17+5:302020-12-22T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केमिकल कंपनीच्या गोपनीय अहवालाची चोरी केल्याप्रकरणी दोघांवर खार पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. ...

केमिकल कंपनीच्या गोपनीय अहवालाची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केमिकल कंपनीच्या गोपनीय अहवालाची चोरी केल्याप्रकरणी दोघांवर खार पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.
खार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे मिथुन नायर (२८) आणि नीता पूचला (३८) अशी असल्याचे समजते. ते दोघे ठाण्याचे रहिवासी असून, एका केमिकल कंपनीत ते कार्यरत होते. कंपनीच्या एक्स्पोर्ट विभागात काम करणाऱ्या या दोघांनी त्याचा गोपनीय डाटा चोरला. मात्र, याबाबत त्यांनी सुरुवातीला कबुली दिली नाही. दरम्यान, गोपनीय माहितीसह या दुकलीने संपर्क केल्याची माहिती एका विदेशी कंपनीने दिली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. संबंधित कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून खार पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.