चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चोरी

By Admin | Updated: November 15, 2014 02:34 IST2014-11-15T02:34:15+5:302014-11-15T02:34:15+5:30

प्रवाशांनी भरलेल्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चोरी झाल्याची घटना सोलापूर ते लोणावळादरम्यान घडली. ही ट्रेन मुंबईत आल्यावर घटना उघडकीस आली.

Theft in the Chennai Express | चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चोरी

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चोरी

मुंबई : प्रवाशांनी भरलेल्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चोरी झाल्याची घटना सोलापूर ते लोणावळादरम्यान घडली. ही ट्रेन मुंबईत आल्यावर घटना उघडकीस आली. एकूण पाच प्रवाशांची रोख रक्कम, सोने, कपडे, मोबाइल असा 6 लाख 48 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. दादर रेल्वे पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणो रेल्वे पोलिसांकडे तो वर्ग करण्यात आला आहे. 
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या दिशेने चेन्नई एक्स्प्रेस येत होती. या ट्रेनने रात्री साडेदहा वाजता सोलापूर रेल्वे स्टेशन पार केले. ट्रेनमधून प्रवास करणा:या प्रवाशांना झोप लागताच ए-1 बोगीमधील तीन आणि एस-7 बोगीमधील दोन प्रवाशांच्या बॅगेची सोलापूर ते लोणावळादरम्यान चोरी करण्यात आली. पुणो स्टेशन गेल्यावर लोणावळा स्थानकानंतर सकाळी प्रवाशांना जाग आली आणि त्यानंतर बॅगांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दादर स्थानकात आल्यावर बॅगांची चोरी झालेल्या प्रवाशांनी रेल्वे पोलीस (जीआरपी) स्थानकात तक्रार दाखल केली. यात ए-1 डब्यातील एका प्रवाशाचा 2 लाख 93 हजार रुपयांचा, दुस:या प्रवाशाचा 63 हजार रुपयांचा आणि तिस:या प्रवाशाचा 2 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याचप्रमाणो एस-7 बोगीमधील दोन प्रवाशांचा मिळून 26 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Theft in the Chennai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.