मेडिकलला प्रवेश देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक
By Admin | Updated: February 11, 2015 00:13 IST2015-02-11T00:13:11+5:302015-02-11T00:13:11+5:30
तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेडिकलला प्रवेश देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक
नवी मुंबई : तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन देण्याच्या बहाण्याने दोघांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई येथे राहणाऱ्या जेरी डायस आणि त्यांचे एक सहकारी या दोघांसोबत ही फसवणूक झाली आहे. पनवेल येथे राहणाऱ्या प्रशांत पटनाईक याच्यासोबत त्यांची ओळख झालेली. त्यानुसार प्रशांत याने सदर दोघांच्या मुलांना तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन देतो असे सांगितलेले. त्याकरिता दोघांकडून एकूण ५१ लाख रुपये घेतले होते. तसेच रक्कम घेतल्यानंतर प्रवेश दिल्याची बनावट पावती दिलेली. अखेर हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी प्रशांत याच्याविरोधात नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र प्रशांत पटनाईक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.(प्रतिनिधी)