वरळीत पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:16+5:302020-12-05T04:09:16+5:30
मुंबई : वरळीतील पांडुरंग बुधकर मार्गावर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी विनयकुमार शेट्टीयार ...

वरळीत पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
मुंबई : वरळीतील पांडुरंग बुधकर मार्गावर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी विनयकुमार शेट्टीयार (२०) यांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, परिसरातील सीसीटीव्हींच्या मदतीने दुचाकीचा शोध सुरू आहे.
....................................
सव्वातीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला
मुंबई : ॲण्टॉप हिल परिसरात राहणारे विक्रम कोठारी यांच्या घरातून १४ ते २६ नोव्हेंंबर दरम्यान सव्वातीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी ॲण्टॉप हिल पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली असून, पाेलीस तपास सुरू आहे.
.................................
ॲण्टॉप हिलमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण
मुंबई : ॲण्टॉप हिल येथून १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने मुलीचा शोध सुरू आहे. तसेच परिसरातील मित्र मंडळीसह नातेवाइकांकडेही पोलीस चौकशी करीत आहेत.
.................................