Join us  

पक्ष्यांच्या पंखांतून मांडली पर्यावरण ऱ्हासाची गाथा ! कुलाबा येथे कलाकृतींचे ‘रिक्विम’ प्रदर्शन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 10:54 AM

सारिका बजाज यांच्या कलाकृतींचे कुलाबा येथील दालनात प्रदर्शन.

मुंबई : कलाकार सारिका बजाज यांचे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे प्रतिबिंब मांडणाऱ्या कलाकृतींचे ‘रिक्विम’ प्रदर्शन सुरू झाले आहे. कुलाबा येथील अनुपा मेहता कला दालनात ३० एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत खुले राहणार आहे. 

मागील १२ वर्षांपासून पक्ष्यांच्या पंखांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींद्वारे व्यक्त होत आहे. वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणात विविध पक्षांचे विखुरलेले पंख हे माझ्यासाठी कलेचे, व्यक्त होण्याचे माध्यम आहे. ‘रिक्विम’ या प्रदर्शनात छायाचित्र, शिल्प, वस्त्रकलेच्या माध्यमातून कलाकृती यांचा समावेश आहे, अशी माहिती या अनोख्या संकल्पनेविषयी कलाकार सारिका बजाज यांनी दिली.

कोरोनाच्या काळात घर आणि आजूबाजूच्या परिसरातील विखुरलेले पंख एकत्र करून त्यातून काहीतरी सृजनशील घडविण्याचा विचार मनात आला. त्यानंतर हे पंख जमा करण्यात आले. त्यावर बोरिक पावडर टाकून गोठवणे, त्यानंतर त्यावर हायड्रोजन पॅराक्साॅइडने धुवून घेतले. जमा केलेल्या पंखांमधील पिसाचा मुख्य भाग काढून ठेवण्यास सुरुवात केल्यांचे त्यांनी सांगितले. 

वैयक्तिक गर्भीत शांततेचे प्रतीक :

कोरोना काळात अनेक पिसे, पंख गोळा केले. एका ज्यूटच्या माध्यमावर ही पिसे एकत्र करून कलाकृती घडविण्यास सुरुवात केली, ही प्रक्रिया ध्यानासारखी होती. या काळात अनेक पक्ष्यांच्या विखुरलेल्या पंखांचा, पिसांचा वापर केला. ही कलाकृती पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागला. या कलाकृतीसाठी कापड, सुतळी आणि धाग्यांचाही वापर केला आहे. ही कलाकृती पर्यावरणाची होणारी हानी यासोबतच वैयक्तिक गर्भित शांततेचेही प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईकुलाबाकला