स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न

By मनोहर कुंभेजकर | Published: March 22, 2024 07:47 PM2024-03-22T19:47:55+5:302024-03-22T19:48:14+5:30

गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवरायांना अभिवादन

The 'Shivarai Sanchalan' organized by the Federation of Local People's Rights Committee concluded with enthusiasm | स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न

मुंबई- ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ तेजस्वी पुतळा, पालखी, वारकर्‍यांच्या मंगलमय भजनासह दानपट्टा, ढाल-तलवार, लाठीकाठी, चौरंग चक्र असे शिवकालीन प्रेरणादायी साहसी खेळ आणि भगव्या टोप्या, भगवी वस्त्रे परिधान केलेल्या शिवभक्तांमुळे काल फोर्ट परिसरात अक्षरश: शिवशाहीच अवतरली. निमित्त होते स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित भव्य शिवराय संचलनाचे.

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने दरवर्षी भव्य ‘शिवराय संचलन' सोहळा आयोजित करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर यावर्षीही मोठ्या उत्साहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारतीय रिझर्व बँक, अमर बिल्डिंग, फोर्ट मुंबई येथून शिवराय संचलनाची सुरुवात झाली. ढोलताशाचा गजर, नाशिक बाजा, लेझीमचा ताल, तुतारीचा निनाद, संबळ आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी या सोहळ्याची सुरुवात झाली. शिवराय संचलनात भगव्या टोप्या, गमजे घालून कार्यकर्ते तर भगव्या नऊवारी साड्या प्रधान करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिवराय संचलनामध्ये भारतीय कामगार सेना, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व समित्यांच्या आस्थापनांमधील कर्मचारी-भगिनी,  शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष  विलास पोतनीस, सरचिटणीस  प्रदीप मयेकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, आमदार रमेश कोरगावकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, विभागप्रमुख आशीष चेंबुरकर, संतोष शिंदे, महेश सावंत, उदेश पाटेकर, प्रमोद शिंदे, गजानन चव्हाण, महिला आघाडीच्या युगंधरा साळेकर यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रदीप मयेकर, रवींद्र कुवेसकर, वामन भोसले, प्रदीप बोरकर, अनिल चव्हाण, दिनेश बोभाटे, विजय अडसुळे, हेमंत गुप्ते, अजित सुभेदार, उल्हास बिले, शरद जाधव, सुधाकर नर, विलास जाधव, अजय गोयजी, ऊमेश नाईक, श्रीराम विश्वासराव, शरद एक्के, ललित साने, हेमंत रासम, संदीप गावडे, रमेश गवळी, प्रवीण हाटे, तुकाराम गवळी, दशरथ गांधी, शाम परब, प्रविण हाटे, नितीन रेगे, किरण फडणीस, प्रदीप पाटील, राजन तांडेल, कृष्षा घाटकर, किरण पिंपुटकर, महेश शिवडावकर, दशरथ गांधी, दिनेश भोसले, अरूण कोळी, राजेश राऊत आणि बाळासाहेब कांबळे तसेच महिला आघाडीच्या निलिमा भुर्के, कल्याणी सावंत, स्मिता तेंडुलकर, धनलक्ष्मी केंकरे, शर्वरी शेट्ये, माया परांजपे, अक्षया फोंडके, बने, माटे, भानुशाली भोईर, पावसकर, पाटील, ललिता माळवदकर या महिला आघाडी पदाधिकारी आणि  विभागप्रमुख संतोष शिंदे  आणि त्यांच्या सहकार्‍यांनी  विशेष मैहनत घेतली.

शिवयायांच्या पुतळ्याचे आकर्षण

- शिवराय संचलनासाठी फुलांनी सुशोभित केलेल्या वाहनात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आकर्षण ठरला. संचलनाच्या निमित्ताने दानपट्टा, ढाल-तलवार, बाराबनाटी, चौरंग चक्र अशा शिवकालीन मर्दानी खेळांच्या सादरीकणाला शिवभक्तांनी दाद दिली. फुलांनी फुलांनी सजवलेली शिवपालखी वाहून येणारे मावळेही लक्षवेधक ठरले. या पालखीसोबत वारकरी भजन पथकही शिवराय आणि हरीनामाचा गजर करीत होते. संचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवरायांना अभिवादन

संचलनात या मार्गावरील हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. शिवराय संचलनाचा समारोप गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

Web Title: The 'Shivarai Sanchalan' organized by the Federation of Local People's Rights Committee concluded with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.