फोर्ट येथे इमारतीच्या बाल्कनीचा संरक्षक कठडा कोसळला 

By जयंत होवाळ | Updated: April 19, 2024 22:58 IST2024-04-19T22:57:19+5:302024-04-19T22:58:39+5:30

तीनजण जखमी.

The protective wall of the balcony of the building collapsed at Fort | फोर्ट येथे इमारतीच्या बाल्कनीचा संरक्षक कठडा कोसळला 

फोर्ट येथे इमारतीच्या बाल्कनीचा संरक्षक कठडा कोसळला 

मुंबई : मुंबईतील एमजी रोड वरील फोर्ट परिसरातल्या वाडिया या दोन मजली इमारतीचे पाडकाम सुरु असताना बाल्कनीचा संरक्षक कठडा कोसळून तीनजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. जखमींपैकी एकाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर उर्वरित दोघांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. या घटनेनंतर येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

इमारत जुनी झाल्याने ती पाडण्याचे पाडकाम सुरु होते. त्यासाठी इमारत रिकामी करण्यात आली होती. इमारतीचा बाजूचा परिसर व्यावसायिक व सतत रहदारीचा आहे. पाडकाम सुरू असताना दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास इमारतीच्या बाल्कनीचा संरक्षक कठडा खाली कोसळला. यात तीन पादचारी जखमी झाले. या दुर्घटनेची अधिक चौकशी अग्निशमन दल, पोलिस व संबंधित यंत्रणेकडून केली जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The protective wall of the balcony of the building collapsed at Fort

टॅग्स :Mumbaiमुंबई