Join us

विमान २० तास खोळंबले; डीजीसीएची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस, प्रवाशांचा संताप

By मनोज गडनीस | Updated: May 31, 2024 16:51 IST

दिल्ली - सॅनफ्रान्सिस्को विमानात प्रवाशांनाही झाला त्रास.

मनोज गडनीस,मुंबई : एअर इंडिया कंपनीच्या दिल्ली ते सॅनफ्रान्सिस्को विमानाला तब्बल २० तास विलंब झाल्याच्या पार्श्वभूमीवर व या कालावधीत काही प्रवासी आजारी पडल्याच्या घटनेची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेतली असून एअर इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. 

३० मे रोजी कंपनीचे विमान सॅनफ्रान्सिस्कोला जाण्याच्या तयारीत असताना विमानामध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला. मात्र, तरीही विमानातील प्रवाशांना याची कोणतीही कल्पना न देता अनेक तास विमानातच बसवून ठेवण्यात आले. त्याच दरम्यान विमानातील वातानुकुलित यंत्रणा देखील बंद पडल्यामुळे अनेक प्रवाशांना गुदमरायला झाले तर काही प्रवाशांना चक्कर आल्याच्या देखील घटना घडल्या. प्रवाशांच्या सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला ही कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या विमानात सुमारे २०० प्रवासी होते. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत एअर इंडिया कंपनीला विविध कारणास्तव डीजीसीएकडून मिळालेली ही दहावी नोटीस आहे.

टॅग्स :मुंबईएअर इंडिया