Join us

महालक्ष्मी देवीच्या भाविकांचा मार्ग सुखकर; वाहनतळ ते मंदिरापर्यंत पदपथाची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 08:52 IST

दर्शनाला येणाऱ्या भाविकांना वाहन मंदिराच्या नजीकच्या  रस्त्यावर पार्क करावे लागत हाेते. कु

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोड कामाच्या अंतर्गत निर्माण झालेल्या भराव क्षेत्रावर भुलाभाई देसाई मार्ग सार्वजनिक वाहनतळ ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत पदपथ बांधण्यात आला आहे. या पदपथाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या पदपथामुळे महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात सहजरीत्या पोहोचता येणार आहे.    

दर्शनाला येणाऱ्या भाविकांना वाहन मंदिराच्या नजीकच्या  रस्त्यावर पार्क करावे लागत हाेते. कुठेही पार्क केलेली वाहने वाहतूक पोलिसांनी नेल्यामुळे भाविकांचे अर्धे लक्ष दर्शनाकडे, तर अर्धे लक्ष वाहनाकडे लागलेले असायचे.

वृद्ध, दिव्यांगांसाठी उपयुक्त मार्गभाविकांना सार्वजनिक वाहनतळात वाहन उभे करून, पदपथावरून बॅटरी कारने थेट महालक्ष्मी मंदिर जाता येणार आहे. विशेषत: वृद्ध व दिव्यांगासाठी हा पदपथ महत्त्वाचा ठरणार आहे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत हा पदपथ उपयुक्त ठरणार आहे. 

नवीन पदपथ पूर्ण करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांनी दिले होते. त्यानुसार पदपथ घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुला केला आहे.