दसऱ्या मेळाव्याला अशी असणार वाहतूक व्यवस्था; घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा!

By मनीषा म्हात्रे | Published: October 4, 2022 06:44 PM2022-10-04T18:44:49+5:302022-10-04T19:04:43+5:30

मेळाव्यांना मुंबईसह राज्यातील वेगवेगळया भागातून शिवसैनिक येणार आहेत.

The Mumbai transport arrangements for the Dasara Mela will be as follows; Be sure to read it before you leave the house! | दसऱ्या मेळाव्याला अशी असणार वाहतूक व्यवस्था; घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा!

दसऱ्या मेळाव्याला अशी असणार वाहतूक व्यवस्था; घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा!

Next

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे यंदा प्रथमच दसऱ्याला दोन मेळावे होत आहेत.  दोन्ही गट आपल्या मेळाव्यात विक्रमी गर्दी होईल, असा दावा करत असल्याने पोलिसांवरील ताणही वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मेळाव्यांना मुंबईसह राज्यातील वेगवेगळया भागातून शिवसैनिक येणार आहेत.

परिणामी याचा मोठा ताण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर पडणार असल्याने मुंबई पोलिसांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर, तसेच कार्यक्रम स्थळी जाण्याच्या मार्गावर वाहनांची मोठया प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी ०५ ऑक्टोबरच्या सकाळी ०९ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले आहेत.

असे असणार बदल...

शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी बदल:-
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते:-

१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बॅक सिग्नलपर्यंत,
२. केळूस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर),
३. एम. बी. राऊत मार्ग हा एस. व्ही. एस. रोडपर्यंत,
४. पांडुरंग नाईक मार्ग हा एम. बी. राऊत रोडपर्यंत,
५. दादासाहेब रेगे मार्ग हा सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौकपर्यंत,
६. दिलीप गुप्ते मार्ग हा शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोडपर्यंत,
७. एन. सी. केळकरमार्ग हा हनुमान मंदिर ते गडकरी चौकपर्यंत,
८. एल. जे. रोड हा राजा बडे सिग्नल ते गडकरी जंक्शनपर्यंत,

वाहनांना प्रवेश बंदी असलेले आणि पर्यायी मार्ग:-

१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग हा सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते कापड बाजार जंक्शनपर्यंत बंद,
पर्यायीमार्ग :- सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शनपर्यंत बंद पर्यायीमार्ग :- एल. जे. रोड, गोखले रोड- स्टिलमॅन जंक्शनवरून पुढे गोखले रोडचा वापर करतील.
३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहीनी बंद
पर्यायीमार्ग - राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
४. गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर. पर्यायीमार्ग:- एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.
५. दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत.
६. बाळगोविंद दास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोड पासुन पश्चिम दिशेला एल. जे. मार्गा पर्यंत.

शिवाजीपार्क दसरा मेळाव्यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था :-

पश्चिम आणि उत्तर उपनगरे पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम दुतगती मार्गाने मेळाव्या साठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने खालील ठिकाणी पार्क करतील.
बसेससाठी पार्किंग - कामगार मैदान सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड

कारसाठी पार्किग:- इंडिया बुल फायनान्स सेंटर सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टर रोड, कोहिनूर स्क्वेअर कोहिनुर स्क्वेअर, कोहिनुर मिल कंम्पा, दादर

पुर्व उपनगरे :-

ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने खालील ठिकाणी पार्क करतील
बसेससाठी पार्किग:- पाच गार्डन माटुंगा नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड, आर. ए. के. रोड, चार रस्ता वडाळा, लेडी जहांगीर रोड, माटुंगा, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा

शहरे व दक्षिण मुंबई:- वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने रविंद्र नाटय मंदिर येथे लोकांना उतरवून खालील ठिकाणी पार्क करतील. बसेससाठी पार्किंग:- आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी
कारसाठी पार्किग:- इंडियाबुल इंटरनॅशनल सेंटर सेनापती बापट मार्ग, एलफिन्सटन, ज्युपिटर मिल कंम्पा. सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन,

शिंदे गट दसरा मेळावा :-

एमएमआरडीए मैदान बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा पूर्व येथील दसरा मेळाव्यासाठी वाहतूक व्यवस्था :-
प्रवेश बंदी मार्ग (दसरा मेळावा करीता लोकांना घेवून येणारी वाहने वगळून)
१. पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शन कडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

२. संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

३. खेरवाड़ी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेश बंदी राहील.

४. सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथुन प्रवेशबंदी राहील.

५. पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, बीकेसीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना कनेक्टर ब्रिज चढण दक्षिण वाहीनी (चुनाभट्टी वा. वि. हद्दीत) येथुन जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग

१ पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सि.लीक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणारी वाहने फॅमीली कोर्ट जंक्शन येथून यु टर्न घेवुन, (खेरवाडी वाहतूक. वि. हददीत) एमएमआरडीए जंक्शन येथून डावे वळत घेवुन टि जंक्शन वरून कुर्ला कडे तसेच पूर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

२. संत ज्ञानेश्वर मार्गावरून इन्कमटॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक हॉस्पीटल जवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथुन कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टि जंक्शनवरून पुढे कुर्ला कड़े मार्गस्थ होतील.

३. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथुन युटर्न घेवुन (खेरवाडी वा.वि. हद्दीत) शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी. वा. वि. हद्दीत) टि जंक्शन पुढे वरुन कुर्ला कडे मार्गस्थ होतील.

४ सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथून सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

५ पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, बीकेसीच्या दिशेने जाणारी सर्व वाहने सायन सर्कल येथे उजवे वळन घेवून ि जंक्शन, कलानगर जंक्शन येथुन पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

पश्चिम हृतगती महामार्ग, धारावी वरळी सि. लिंक कडून मेळाव्यामध्ये सहभागी लोकांना घेवून येणारी वाहने पार्किग करीता पुढील ठिकाणी रवाना होतील

बसेस साठी पार्किग व्यवस्था:-

१. फॅमीली कोर्ट पाठीमागील बाजू व्हाया जेतवन बिल्डींग ते इन्कम टॅक्स जंक्शन पर्यतीची मोकळी जागा
२. कॅनरा बँके जवळील एमएमआरडीए पे ॲन्ड पार्क पार्किग.
३. पंजाब नॅशनल बँक समोरील मोकळे मैदान
४. फटाका मैदान कॅनरा बॅके समोरील मैदान (कनेक्टर ब्रिज शेजारी)
५. एमएमआरडीए ऑफीस समोर, मागील मोकळी जागा.
६. जिओ गार्डन जवळ एमएमआरडीए पे ॲन्ड पार्क

कारसाठी पार्किंग व्यवस्था:-

जिओ गार्डन बेसमेंट पार्किंग (बिकेसी)

नवी मुंबईकडून बिकेसी कोक्टर ब्रिजमार्गे बिकेसी येथील कार्यक्रमस्थळी मेळाव्यात सहभागी लोकांना घेवून येणारी वाहने पुढील ठिकाणी पार्किग करीता रवाना होतील.

बसेस साठी पार्किंग व्यवस्था

१. दुई वर्क बिल्डींग शेजारील मोकळे मैदान
२. ओएनजीसी बिल्डींगचे उजवे व डावीकडील मोकळे मैदान
३. कॅनरा बँक समोरील मोकळे मैदान
४. सोमैय्या कॉलेज मैदान चुनाभट्टी

कारसाठी पार्किंग व्यवस्था

एम.सी.ए. क्लब कार पार्किंग

पश्चिम दृतगती मागाने कलीना मधून येणारी वाहने तसेच पूर्व दृतगती मागाने एससीएलआर मार्गे मेळाव्यामध्ये सहभागी लोकांना घेवून येणारे वाहने पार्किंग करीता पुढील ठिकाणी रवाना होतील

बसेससाठी पार्किंग व्यवस्था:-

सीबीआय बिल्डींग शेजारील मोकळे मैदान
टाटा कम्युनिकेशन ते इन्कमटॅक्स क्वॉटर्स रोडपर्यंत एमटीएनएल ऑफिस जवळ, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स पार्किंग
हॉटेल ट्रायडेंन्ट गॅप ते बीकेसी रोडपर्यंत पार्किंग
अंबानी सकुल शेजारील पे ॲन्ड पार्क पार्किग
एम.टी.एन.एल ते कनेक्टर जंक्शन एकेरी पार्किंग
युनिव्हर्सिटी गेट मधील मोकळा परिसर जे. कुमार इन्फास्ट्रक्चर एमटीएनएल जवळील मोकळे मैदान
ट्रेड सेन्टर समोरील मोकळी जागा.
मुंबई विद्यापिठ, कलीना, सांताक्रूझ पूर्व

कारसाठी पार्किग व्यवस्था :-

१. डायमंड बोर्स बेसमेंट पार्किग, डायमंड मार्केट इमारत, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स
२. जिओ कन्वेन्शन सेंटर पार्किग, जिओ कंन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, मुंबई

कार्यक्रमस्थळी व्ही.आय.पी/व्ही.व्ही.आय.पी यांचे वाहने पुढील ठिकाणी पार्किग करीता रवाना होतील
पार्किगचे ठिकाण :-
जे.एस. डब्लू समोरील मोकळे मैदान, जे.एस. डब्लू इमारत, बांद्रा कुर्ला काम्पलेक्स

Web Title: The Mumbai transport arrangements for the Dasara Mela will be as follows; Be sure to read it before you leave the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.