Join us

रेल्वे पुलावरील गर्दुल्यांनी मोबाईल हिसकवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकावर केला जीवघेणा हल्ला

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 2, 2024 18:24 IST

Mumbai News: रेल्वे पूल हा जणू गर्दुल्यांच्या चरस विकणाऱ्यांचा अड्डा झाला आहे.यामुळे पूलावरून चालतांना पादचाऱ्यांना तर जीव मुठीत घेवून चालावे लागते.विलेपाल्यात काल दुर्दैवी घटना घडली.येथील जेष्ठ नागरिकावर रेल्वे पूलावरून चालत असतांना गर्दल्यांनी मोबाईल हिसकवण्यासाठी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - रेल्वे पूल हा जणू गर्दुल्यांच्या चरस विकणाऱ्यांचा अड्डा झाला आहे.यामुळे पूलावरून चालतांना पादचाऱ्यांना तर जीव मुठीत घेवून चालावे लागते.विलेपाल्यात काल दुर्दैवी घटना घडली.येथील जेष्ठ नागरिकावर रेल्वे पूलावरून चालत असतांना गर्दल्यांनी मोबाईल हिसकवण्यासाठी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,विलेपार्ले पूर्व व पश्चिमेला जाण्यासाठी चर्चगेटच्या दिशेने रेल्वे पदाचारी पूल आहे. तो आता गर्दुल्ले व चरस विकणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. या पूलावरून जेष्ठ नागरिक चौधरी  हे जात असताना काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पूलावरील गर्दुल्यांनी त्यांचा मोबाईल हिसकवण्यासाठी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ केले थोडक्यात त्यांचा जीव वाचला.

चौधरी यांना मारहाण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.सदर व्हिडिओ उद्धव सेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी बघितला.तात्काळ सदर घटनेची दखल घेऊन त्यांनी उद्धव सेनेच्या येथील शिष्टमंडळासह अंधेरी रेल्वे पोलीस  स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि सदर घटनेची सविस्तर माहिती दिली.येथील गर्दुल्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना पकडण्यात यावे. अन्यथा  उद्धव सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डिचोलकर यांनी दिला.

आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल व नशा करणाऱ्या लोकांना पकडण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी उद्धव सेनेचे संतोष कदम ,आनंद पाठक ,नितेश गुरव, हितेश खानविलकर ,सुधाकर कोटियन   जितेंद्र शिर्के ,ओमकार कदम उपस्थित होते.  

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई