Join us

महाबळेश्वर १२ तर मुंबई २१ अंश; राज्याला हुडहुडी, उत्तरोत्तर थंडीत आणखी वाढ होणार

By सचिन लुंगसे | Updated: December 20, 2023 17:06 IST

उत्तर भारतात आता कडाक्याची थंडी पडली असली तरी येथे काही दिवसांत बर्फवृष्टीही होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान खाली घसरत असून, बुधवारी महाबळेश्वरसह अनेक शहरांत किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली नोंदविण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यासह विदर्भातल्या शहरांचा यात समावेश असून, विदर्भातील काही शहरे ९ अंशावर आहे. किमान तापमानातील घसरणीमुळे राज्याला हुडहुडी भरली असून, उत्तरोत्तर थंडीत आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.उत्तर भारतात आता कडाक्याची थंडी पडली असली तरी येथे काही दिवसांत बर्फवृष्टीही होण्याची शक्यता आहे. बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील गार वारे महाराष्ट्राकडे वाहू लागल्यानंतर राज्यासह मुंबईतल्या किमान तापमानाचा पारा आणखी खाली येईल. मुंबईचे किमान तापमान आता २१ अंश नोंदविण्यात येत आहे. २५ डिसेंबरनंतर यात आणखी घसरण होईल. किमान तापमान १८ अंशावर दाखल होईल.

- सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागशहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.

अहमदनगर ११.५छत्रपती संभाजी नगर ११.४बीड १२.९जळगाव ११.७जेऊर १२कोल्हापूर १६महाबळेश्वर १२.९मालेगाव १३मुंबई २१.२नांदेड १४नाशिक १४.४धाराशीव १५परभणी १२.७सांगली १५.८सातारा १५.१सोलापूर १५.५उदगीर ११अकोला ११.४अमरावती १०.६बुलढाणा ११चंद्रपूर ९.४गडचिरोली ९.६गोंदिया ९.२नागपूर ९.८वर्धा १०.६वाशिम ९.८

टॅग्स :तापमानमहाराष्ट्रमहाबळेश्वर गिरीस्थान