रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

By सचिन लुंगसे | Published: April 12, 2024 06:13 PM2024-04-12T18:13:18+5:302024-04-13T09:40:14+5:30

सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी / सेमी जलद लोकल मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

The local will have a latemark on Sunday | रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

मुंबई : मध्य रेल्वेच्या वतीने अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी १४ एप्रिल रोजी मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गवरही ब्लॉक असणार आहे.

५ तासांचा जम्बो ब्लॉक-

१) पश्चिम रेल्वे मार्गावरील रूळ, सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकरिता १४ एप्रिल रोजी बोरीवली-गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. 

२)   ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल बोरीवली-गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून, बोरीवली व अंधेरी लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालविल्या जातील.

सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी / सेमी जलद लोकल मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या / सेमी जलद सेवा कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे अप धीम्या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. मुलुंड येथे १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला व पनवेल - वाशी या दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाऊन धीमा मार्ग-

शेवटची लोकल : ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी ९.५३ वाजता सुटेल.

पहिली लोकल : ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३.०५ वाजता सुटेल.

अप धीमा मार्ग-

शेवटची लोकल : ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण आहे. कल्याण येथून ही लोकल सकाळी १०.२५ वाजता सुटेल.

पहिली लोकल : ब्लॉकनंतरची पहिली लोकल परळ आहे. ठाणे येथून ही लोकल दुपारी ४.१७ वाजता सुटेल.

डाऊन हार्बर-

शेवटची लोकल : ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी १०.१८ वाजता सुटेल.

पहिली लोकल : ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३.४४ वाजता सुटेल.

अप हार्बर-

शेवटची लोकल : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेल येथून सुटेल.

पहिली लोकल : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ३.४५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

Web Title: The local will have a latemark on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.