शिवाजीपार्क मध्ये वर्ल्ड कपचा जोश

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 19, 2023 18:43 IST2023-11-19T18:40:15+5:302023-11-19T18:43:12+5:30

हा सामना पाहताना क्रिकेट प्रेमीमध्ये जोश दिसून येत होता.

The excitement of the World Cup in Shivaji Park | शिवाजीपार्क मध्ये वर्ल्ड कपचा जोश

शिवाजीपार्क मध्ये वर्ल्ड कपचा जोश

मुंबई :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चूरशीचा सामाना अनुभवण्यासाठी त्याचा आनंद लुटण्यासाठी शिवाजीपार्क येथे  मोठ्या स्क्रीनवर क्रिकेटचा सामाना लावण्यात आला होता हा सामना पाहताना क्रिकेट प्रेमीमध्ये जोश दिसून येत होता.

नागरिकांना क्रिकेटचा वर्ल्ड कप सामाना एकत्र पाहता यावा यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजीपार्क येथे भव्य स्क्रीन लावण्यात आली होती अशी माहिती मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

एरव्ही दादर मधील गजबजलेले रस्ते वर्ल्ड कप मॅच असल्याने औस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत होते तर वाहतूकही कमी असल्याचे दिसून आले. प्रभादेवीत कै राजा भाऊ साळवी मनोरंजन उद्याना शेजारील परिसरात देखील मोठी स्क्रीन लावली होती प्रभादेवीतील रस्ते सूने पडले होते.

प्रत्येक ठिकाणी ग्रुप ग्रुपने घरा घरात मॅच पाहताना त्याचा आनंद घेत भारतासाठी प्रोत्साहन देत घोषणा बाजी करण्यात येत होती.तर काही जणांनी भारतीय संघा सारखे कपडे परिधान करून हातात बॅट आणि बॉल घेऊन भारतीय संघाला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

Web Title: The excitement of the World Cup in Shivaji Park

टॅग्स :Mumbaiमुंबई