Join us

वीज कनेक्शन ऑटोमॅटिक नव्या मालकाच्या नावे होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:18 IST

महावितरणचा ‘ईज ऑफ लिव्हिंग’ उपक्रम : माहिती तंत्रज्ञानाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुने घर, दुकान खरेदी केल्यानंतर विजेची जोडणी जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ बंद होणार आहे. कारण ‘ईज ऑफ लिव्हिंग’ या उपक्रमानुसार आपोआप विजेची जोडणी नव्या मालकाच्या व्हावी म्हणून महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवी व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो. आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाईनही भरू शकतात. फी भरली की विजेची जोडणी त्याच्या नावावर होते. पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने येते.

नवीन सेवा सुरूग्राहकांना अशा प्रकारे विजेची जोडणी आपोआप बदलून मिळण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून आता ग्राहकांना या नवीन सेवेचा लाभ घेता येणार आहे.

ग्राहकांना दिलासाएकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे विजेची जोडणी ट्रान्स्फर करायची याची निवड करण्यास सांगितले जाते. कारण विजेचे जोडणी एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते. नव्या प्रक्रियेत विजेची जोडणी नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.    - विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण

 

टॅग्स :वीजमुंबई