खेळता खेळता चिमुरड्याने सोडले प्राण...; विजेचा शॉक लागून मृत्यू

By मनीषा म्हात्रे | Updated: October 30, 2023 17:32 IST2023-10-30T17:32:07+5:302023-10-30T17:32:57+5:30

मुलुंडच्या शंकर टेकडी परिसरात राहणाऱ्या अर्णव भंडारी (६) या मुलाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

The child died while playing...; Death due to electric shock in mulund | खेळता खेळता चिमुरड्याने सोडले प्राण...; विजेचा शॉक लागून मृत्यू

खेळता खेळता चिमुरड्याने सोडले प्राण...; विजेचा शॉक लागून मृत्यू

मुंबई : मुलुंडमध्ये घराबाहेर खेळत असताना उघड्या विद्युत वायरला स्पर्श होऊन एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. 

मुलुंडच्या शंकर टेकडी परिसरात राहणाऱ्या अर्णव भंडारी (६) या मुलाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास तो घराबाहेर मांजरीसोबत खेळत होता. याठिकाणी विजेच्या काही उघड्या तार होत्या.  यातील एका उघड्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला. त्याच्या ओरडण्याने कुटुंबीयांनी त्याच्याकडे धाव घेतली. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला  तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याठिकाणी उपचार न झाल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू करण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. याबाबत मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहे. 

Web Title: The child died while playing...; Death due to electric shock in mulund

टॅग्स :Mumbaiमुंबई