Join us

मुख्यमंत्र्यांनी SRA बाबत दिलेल्या आदेशाची झाली  अंमलबजावणी, आमदारांच्या पाठपुरव्याला यश

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 27, 2023 17:46 IST

२०० जणांना मिळाले एका वर्षांचे अडीच कोटी भाडे

मनोहर कुंभेजकर, मुंबई: मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र १२ मधील देवीपाडा एस.आर.ए  आणि महाकाली एस.आर.ए  या दोन्ही संस्थांमधील झोपडीतधारकांना गेली आठ ते दहा वर्षे घरभाडी मिळाली नव्हती. त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यापैकी तीन जणांनी आत्महत्या देखील केली होती.आज झोपडीधारकांना एक वर्षांचे भाडे मिळाले असून गणपतीच्या  शुभ मुहूर्तावर नागरिकांचा  गणपती सण गोड व्हावा याकरिता २०० जणांना एका वर्षांचे एकूण अडीच कोटी रुपये घर भाडे आज सुपूर्द करण्यात आले अशी माहिती स्थानिक आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी दिली.

ही बाब आमदार  प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी निदर्शनास आणली होती. यावर त्वरित  मुख्यमंत्री महोदयांनी विकासकाला झोपडीधारकांची एक वर्षांचे भाडे देण्याचे आदेश दिले आणि गणपतीच्या या शुभ मुहूर्तावर नागरिकांचा  गणपती सण गोड व्हावा याकरिता २०० जणांना एका वर्षांचे एकूण अडीच कोटी रुपये घर भाडे आज सुपूर्द करण्यात आले . तसेच उर्वरित झोपडीधारकांना येत्या आठ दिवसांच्या कालावधीने टप्याटप्याने त्यांच्या खात्यामध्ये आर.टी.जी.एस च्या माध्यमातून घरभाडे  दिले  जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

आज झालेल्या अंमलबजावणीमुळे आणि मिळालेल्या घरभाडयामुळे नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांमुळे विकासक विजय पारेख यांनी दिलेल्या घरभाड्यामुळे आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांचे  नागरिकांनी आभार मानले आहेत. तसेच महाकाली एस.आर.ए लवकरच पूर्ण करून नागरिकांचे घरात जायचे स्वप्न सत्यात उतरेल अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :प्रकाश सुर्वेआमदार