Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या खांद्यांवर वाढतोय भार; नेपाळसह परराज्यांतील मुलांचा ओढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:37 IST

कारखान्यांत ही मुले काम करताना दिसत आहे. गेल्या चार वर्षांत बालकामगार ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी ८८ गुन्हे नोंद करत २०६ बालकामगारांची सुटका केली आहे. चालू वर्षाच्या चार  महिन्यांत ५ बालकामगारांची सुटका केली आहे.

मुंबई : शिक्षणाबरोबर खेळण्या-बागडण्याच्या वयात कोवळे हात कुठे परिस्थितीअभावी तर कुठे जबरदस्तीने राबताना दिसत आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नेपाळसह परराज्यांतील मुलांचा ओढा अधिक असून, मुंबईच्या विविध

कारखान्यांत ही मुले काम करताना दिसत आहे. गेल्या चार वर्षांत बालकामगार ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी ८८ गुन्हे नोंद करत २०६ बालकामगारांची सुटका केली आहे. चालू वर्षाच्या चार  महिन्यांत ५ बालकामगारांची सुटका केली आहे.

मुंबईच्या कुलाबा, पायधुनी, धारावी, नागपाडा, शिवाजी नगर, मालवणी, ओशिवरा, भांडुप सोनापूरसह विविध विविध कारखान्यांसह हॉटेलमध्ये ही मुले काम करताना दिसतात. काही ठिकाणी १२-१२ तास तर काही ठिकाणी १२ तासांहून अधिक वेळ ही मुलांकडून काम करून घेतली जातात.

ज्वेलरी कारखाना, बॅग बनविणे, प्लास्टिकसह विविध कारखान्यात आजही बालकामगार काम करताना दिसतात. पोलिसांकडून सुरू असलेल्या झाडाझडतीमुळे काहीजण या मुलांना ठेवणे टाळतात. तर, काहीजण मुलांचे वय जास्त सांगून पळवाटा काढत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रकरणात घराच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आई-वडिलांना मदत म्हणून ही मुले मेहनतीचे काम करताना दिसतात. या प्रकरणात पाेलिस काय कारवाइ करणार याकडे आता अनेकांच लक्ष लागले आहे.

आमिष दाखवून आणतात शहरात

काही मुलांना बळजबरीने, मुंबई फिरण्यासाठी, चांगले शिक्षण, पैसे देण्याच्या नावाखाली जुंपले जात आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना योग्य मोबदला न देता त्यांचा छळ केला जात असल्याचेही काही प्रकरणात दिसून आले.

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत, गेल्या वर्षी २६ गुन्हे नोंदवून ६६ बालकामगारांची सुटका केली आहे. २०२२ च्या तुलनेत कारवाईत वाढ झाली आहे. सी.ए.डब्ल्यू.चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Child Labor Increasing in Mumbai: Children from Nepal, Other States Involved

Web Summary : Mumbai factories employ children from Nepal and other states, often under harsh conditions. Police have rescued 206 child laborers in four years, but the problem persists in various industries despite crackdowns. Poverty and false promises drive child labor.