मुंबई : महापौर रितू तावडे यांच्या वाहनासमोर लावलेले लाल व निळे लुकलुकणारे दिवे (फ्लॅशर लाइट्स) महापालिका प्रशासनाने अखेर काढून टाकले. या दिव्यांबाबत सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी संस्कृती मोडीत काढल्याने केंद्र सरकारसह राज्यातील व्हीआयपी कारच्या टपावरील लाल दिवा उतरला. मात्र, महापालिकेच्या महापौर तावडे यांच्या वाहनाला समोरून लावण्यात आलेल्या लाल आणि निळ्या रंगाच्या दिव्यांमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. वर्ष २०१७ पासून लाल दिवे वापरण्यास बंदी असताना महापौरांच्या वाहनाला लाल-निळा दिवा कसा, असा प्रश्न विचारला जात होता. महापौरांच्या ताब्यात व्हीआयपी संस्कृती आली की काय, अशी चर्चा यानिमित्ताने पालिकेत रंगली. भाजपची सत्ता पालिकेवर येताच या नियमाला बगल देत महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनाच्या पुढच्या बाजूस निळे व लाल दिवे बसवण्यात आले होते. त्यावर समाजमाध्यमावरून टीका होऊ लागली होती. अखेर पालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील हे दिवे काढून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.विरोधी पक्षनेत्यांची टीका २०१७ मध्ये अशा वाहनांवर लाल-निळे दिवे लावले जाऊ नयेत असा नियम झाला. मी सुद्धा महापौर राहिलेली आहे, मला जे नियम सांगण्यात आलेले होते, त्यानुसार मी त्याचे प्रोटोकॉल पाळले होते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. यावेळी प्रोटोकॉल विचारून महापौरांनी माहिती घेतली नाही का, असा सवालही पेडणेकर यांनी केला आहे.
वाहनावरील दिव्यांबाबत नियम काय सांगताे?भारत सरकारच्या १ मे २०१७ च्या राजपत्र अधिसूचनेनुसार सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नावफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी आहे. फक्त अग्निशमन सेवा, पोलिस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन सेवा या सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत लाल, निळा, पांढरा, रंगीबेरंगी दिवा वापरण्याची परवानगी आहे. वाहन अधिकृतपणे कामावर नसताना असा रंगीत दिवा वापरणे बेकायदेशीर आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रशासन कडक कारवाई करू शकते.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वाहनावर लुकलुकणारे दिवे लावण्यात आले होते. त्यावर टीका झाल्यानंतर ते काढून टाकण्यात आले आहेत.
Web Summary : Following criticism, Mumbai Mayor's vehicle's red and blue flashing lights were removed. Despite a 2017 ban on red lights, their use sparked controversy, questioning VIP culture. Opposition leaders criticized the violation of rules.
Web Summary : आलोचना के बाद, मुंबई महापौर की गाड़ी से लाल और नीली बत्तियां हटा दी गईं। 2017 में लाल बत्तियों पर प्रतिबंध के बावजूद, उनके उपयोग ने वीआईपी संस्कृति पर सवाल उठाते हुए विवाद खड़ा कर दिया। विपक्षी नेताओं ने नियमों के उल्लंघन की आलोचना की।