Join us

Mumbai: बेस्टचा कर्मचारी बनून २८ वर्षापासून फरार असलेला आरोपीला बेड्या, विद्युत पुरवठा खंडित करण्याची भीती...

By मनीषा म्हात्रे | Updated: March 22, 2023 20:35 IST

Mumbai: बोगस शेअर्स देवून २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्ह्यातील आरोपीला डॉ.दा.भ. मार्ग पोलिसांनी बेस्टचे कर्मचारी बनून बेड्या ठोकल्या आहे. विरेंद्र प्रविनचंद्र संघवी उर्फ महेश शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहे.

मुंबई : बोगस शेअर्स देवून २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्ह्यातील आरोपीला डॉ.दा.भ. मार्ग पोलिसांनी बेस्टचे कर्मचारी बनून बेड्या ठोकल्या आहे. विरेंद्र प्रविनचंद्र संघवी उर्फ महेश शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहे. विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या भीतीने तो २८ वर्षाने पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.दा.भ. मार्ग पोलीस ठाणे येथे १९९५ मध्ये तक्रारदार राजीव चंद्रभान खंडेलवाल (६७) यांना विविध कंपणीचे २० लाख रूपयाचे बोगस शेअर्स देवुन आरोपी विरेंद्र प्रविनचंद्र संघवी उर्फ महेश शहा याने शेअर्स खरेदी न करता त्यांची फसवणुक केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवत पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्या विरुद्ध दोषारोप पत्रही दाखल करण्यात आले. त्यानंतर, तो जामिनावर बाहेर आला. १९९६ पासून खटल्याच्या सुनावणीस हजर राहणे बंद केल्याने त्याला न्यायालयाने फरार घोषीत केले होते.

त्याने अटक करतेवेळी दिलेल्या सायन येथील वारंवार शोध घेवून देखील त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सणस, रोकडे, नितीन झाडे, कांगणे आणि अंमलदार यांनी तांत्रिक दृष्टया तसेच परीसरातील ४० ते ५० लोकांकडे चौकशी करून शोध घेतला. तेव्हा तीन ते चार विविध पत्ते मिळुन आले, मात्र तेथे देखील तो मिळून आला नाही.  पुढे दाणाबंदर परीसरात त्याच्या मालकीची खोली मिळून आली. मात्र तेथेही तो राहत नसल्याने पोलिसांना त्याचे लाईट बिल मिळाले. पुढेच, याचाच आधार घेत पोलिसांनी बेस्टचे कर्मचारी बनुन खोलीचा लाईट बिलचे व्हेरीफीकेशन करण्याचे कारण पुढे करत त्याच्याशी संपर्क साधला. विद्युत पुरवठा खंडित करण्याची भीती घालताच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यानुसार, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी