Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीतील ‘तो’ भीषण स्फोट सरकारी अनास्थेमुळेच झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूरजवळील एसबीएल कंपनीत झालेला भीषण स्फोट आणि त्यात कामगारांचा झालेला मृत्यू यासाठी सरकारी यंत्रणेची ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूरजवळील एसबीएल कंपनीत झालेला भीषण स्फोट आणि त्यात कामगारांचा झालेला मृत्यू यासाठी सरकारी यंत्रणेची अनास्था कारणीभूत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. या विषयावर शुक्रवारपूर्वी सभागृहात स्वतंत्र चर्चा घडवून आणली जाईल, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. 

 या स्फोटाबाबत वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती, अध्यक्ष नार्वेकर यांनी ती फेटाळली; पण बोलण्याची अनुमती दिली. त्यानंतर वडेट्टीवार म्हणाले की,  नागपूरनजीक अलीकडच्या काळात कंपन्यांमध्ये असेच स्फोट होऊन ४३ कामगार मृत्युमुखी पडले.  नागपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे ११ स्फोटक कारखाने आहेत. केवळ ३०० रुपये मजुरीसाठी जीव धोक्यात घालून हे मजूर काम आहेत.

‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची विनंती, मात्र कारवाई नाहीसरकारला वारंवार या कंपन्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची विनंती करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. स्फोटक पदार्थांवर नियंत्रण ठेवणारे ‘पेसो’ कार्यालय अवघ्या १० किमी अंतरावर असूनही त्यांच्याकडून गांभीर्याने तपासणी होत नाही. याबाबत अनेक तक्रारी झाल्या तरी कारवाई झालेली नाही. ज्या कंपनीत स्फोट झाला, तिथे जाण्यासाठी साधा पक्का रस्तादेखील उपलब्ध नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Factory Blast: Government Neglect Blamed for Worker Deaths

Web Summary : Congress MLA blames government apathy for the Nagpur factory blast that killed workers. He alleges lax safety audits and inaction despite repeated requests. The assembly will discuss the issue before Friday. 11 explosive factories operate in Nagpur district.
टॅग्स :स्फोट