ठाणो शहराची कौटुंबिक घडी विस्कटतेय..
By Admin | Updated: August 6, 2014 00:47 IST2014-08-06T00:47:09+5:302014-08-06T00:47:09+5:30
ठाणो कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनासाठी विवाह समुपदेशकांकडे सध्या सुमारे 7क्क् प्रकरणो प्रलंबित असून त्यात प्रत्येकी चार महिन्याला सुमारे 25क् खटले नव्याने दाखल होत आहेत.

ठाणो शहराची कौटुंबिक घडी विस्कटतेय..
स्नेहा पावसकर ल्ल ठाणो
ठाणो कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनासाठी विवाह समुपदेशकांकडे सध्या सुमारे 7क्क् प्रकरणो प्रलंबित असून त्यात प्रत्येकी चार महिन्याला सुमारे 25क् खटले नव्याने दाखल होत आहेत. नवीन दाखल होणा:या खटल्यांच्या संख्येत दर चार महिन्यांनी वाढ होत असून छोटय़ा-छोटय़ा कारणांमुळे उभयतांना समजून न घेतल्याने ही वाढती संख्या वाढली असून विस्कटणा:या कौटुंबिक घडीचे ती लक्षण ठरते आहे.
कौटुंबिक न्यायालयात दाखल होणारी घटस्फोट, पोटगी,संमतीपत्र, मुलांचा ताबा आणि इतर कौटुंबिक वाद अशी सर्वच प्रकरणो समुपदेशनासाठी विवाह समुपदेशकांकडे पाठविली जातात. विशेष म्हणजे येथे दर चार महिन्याला नव्याने दाखल होणा:या खटल्यांची संख्या वाढते आहे.
31 ऑगस्ट 2क्13 च्या अखेरीस विवाह समुपदेशकांकडे 564 खटले प्रलंबित तर रिपोर्ट दिल्यानंतर पुन्हा समुपदेशनासाठी (रिरिफर्डचे) 38 खटले होते.
सप्टेंबर ते डिसेंबर 2क्13 या कालावधीत नवीन 233 खटले दाखल झाल्याने एकूण 835 खटल्यांची नोंद झाली. डिसेंबर 2क्13 च्या अखेरीस यापैकी 6क्2 खटले प्रलंबित राहिले तर रिरिफर्ड 31 खटले होते. जानेवारी ते एप्रिल 2क्14
या कालावधीत पुन्हा नवीन 253 खटले दाखल झाल्याने एकूण 886 खटले समुपदेशनासाठी होते.
2क्14 च्या मे, जून, जुलै या तीन महिन्यातही मोठया संख्येने नवीन प्रकरणो समुपदेशनासाठी
दाखल झाली असल्याचे ठाणो कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक सुजाता कुलकर्णी यांनी सांगितले.
च्जास्तीत जास्त खटले सामोपचराने मार्गी लावून प्रलंबितची संख्या कमी करण्याचा आमचा उद्देश असतो. परंतु छोटय़ामोठया कारणाने वाद न्यायालयात आणून कौटुंबिक स्थैर्य बिघडवण्यापेक्षा घरगुती पातळीवर आपापसात सामंजस्याने वाद मिटवावे, यासाठीही वर्षभर कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुरू असते.