ठाण्यात पत्नीची हत्या आणि पतीने केली आत्महत्या
By Admin | Updated: April 26, 2015 02:00 IST2015-04-26T02:00:25+5:302015-04-26T02:00:25+5:30
घरात पत्नीची हत्या आणि पतीने एक्स्प्रेसखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

ठाण्यात पत्नीची हत्या आणि पतीने केली आत्महत्या
ठाणे : घरात पत्नीची हत्या आणि पतीने एक्स्प्रेसखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत त्यानेच पत्नीची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. अतुल आणि रूपाली त्रिभुवन असे मयत दाम्पत्याचे नाव आहे.
अतुल मूळचा श्रीरामपूरचा असून त्याचे सहा ते सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शनिवारी सकाळी सव्वासहाच्या दरम्यान अतुलने ठाणे रेल्वे स्थानकातून सीएसटीकडे जाणाऱ्या चालुक्य एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली. त्याची पत्नी रूपालीची हत्या झाल्याचे उघडकीस आले. ही हत्या त्यानेच केली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. दोन्ही मृत्यूंचे कारण समजले नसल्याची माहिती निरीक्षक एस. एम. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)