ठाण्यात टोर्इंगचे दर होणार दुप्पट
By Admin | Updated: March 14, 2015 01:26 IST2015-03-14T01:26:51+5:302015-03-14T01:26:51+5:30
फेरीवाले व अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसाठी ठाणे महापालिकेने ‘‘दामदुप्पट’’ योजना आणली आहे. ती फेरीवाल्यांना तसेच अनधिकृत बांधकामे

ठाण्यात टोर्इंगचे दर होणार दुप्पट
नामदेव पाषाणकर, घोडबंदर
फेरीवाले व अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसाठी ठाणे महापालिकेने ‘‘दामदुप्पट’’ योजना आणली आहे. ती फेरीवाल्यांना तसेच अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांच्या फायद्याची नसून पालिकेला जास्त महसूल कसा मिळेल, यासाठी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़ तसेच टोर्इंगच्या दरातही दुप्पट वाढ केली आहे़
आठ वर्षांनंतर प्रथमच महसुली उत्पन्नात वाढ सुचविणारा प्रस्ताव तयार केला आहे. शहरात अंदाजे ४० हजार फेरीवाले आहेत. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचा खरा आकडा अद्याप समोर येऊ शकलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावातून किती महसूल जमा होणार, हे आगामी वर्षात दिसून येईल. अतिक्र मणविरोधी पथकाकडून अतिक्र मणे, अनधिकृत बांधकामांना आळा बसावा म्हणून त्यांना शास्ती लावण्यासाठी वसूलीचे दर निश्चित करण्यात येतात. ते २००७ पासून वाढविलेले नाहीत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलबजावणीचे आदेश असले तरी रेल्वे स्टेशन, शैक्षणिक संस्था, रु ग्णालये, धार्मिक स्थळे, मंडया या ठिकाणा पासून १०० ते १५० मीटर अंतरात व्यवसाय करण्यास त्यांना प्रतिबंध केला आहे. तरीही व्यवसाय सुरूच असल्याने न्यायालयाचा अवमान होणार असल्याने असा व्यवसाय करणाऱ्यांचा माल जप्त करण्यासह वसूलीचे दर अधिक ५ हजार रुपये दंड आकारला जाणा आहे. येथे व्यवसाय करण्यास प्रतिबंध असणारी ठिकाणे जाहीर न केल्याने पळवाट शोधली जाते. त्यामुळे फेरीवाला धोरण राबवले जात नाही, तोवर वसुलीचे नवीन दर आणि शास्ती वसूल करावी लागेल.