ठाणेकरांनी ढोसली १५ कोटी लीटर बीअर

By Admin | Updated: July 13, 2015 23:16 IST2015-07-13T23:16:43+5:302015-07-13T23:16:43+5:30

जिल्ह्यातील खुशालचेंडूंनी गेल्या वर्षभरात १५.४२ कोटी लीटर बीअर ढोसली आहे. तर, अट्टल तळीरामांनी याच काळात ६.३८ कोटी लीटर देशी आणि ६.४३ कोटी

Thanekar's Dhosali 15 crores liters beer | ठाणेकरांनी ढोसली १५ कोटी लीटर बीअर

ठाणेकरांनी ढोसली १५ कोटी लीटर बीअर

ठाणे : जिल्ह्यातील खुशालचेंडूंनी गेल्या वर्षभरात १५.४२ कोटी लीटर बीअर ढोसली आहे. तर, अट्टल तळीरामांनी याच काळात ६.३८ कोटी लीटर देशी आणि ६.४३ कोटी लीटर विदेशी दारू फस्त केली. तरुणाईने ३० लाख लीटर वाईन याच काळात रिचवली आहे.
अबकारी खात्यामार्फत देण्यात आलेल्या तपशिलातून ही माहिती उघड झाली आहे. बीअरच्या विक्रीत पाच टक्के वाढ झाली आहे. यामागे बीअर टीनमधून व कॅनमधून उपलब्ध असणे, फक्त बीअरची विक्री करणाऱ्या दुकानांत झालेली वाढ आणि बीअर पिणारा दारूडा नव्हे तर एक सोशल स्टॅट््स ड्रिंक आहे, अशी झालेली समाजाची धारणा याबाबी कारणीभूत आहेत. देशी दारू आणि विदेशी दारू यांच्या विक्रीत अत्यंत अल्पशी वाढ झाली आहे. कारण, ती रिचविणाऱ्या मंडळींत फारशी भर पडलेली नाही. तसेच त्यांनी आपल्या आवडीनिवडीतही बदल केलेला नाही. तीच गोष्ट वाईनच्या बाबतीत आहे. तिच्या विक्रीतही किरकोळ वाढ झाली आहे. कारण, वाईन हे लेडिज ड्रिंक आहे, असाच समज पुरुष मंडळींत असल्याने तिच्या वाढीवर मर्यादा आल्या आहेत. टीन आणि कॅनमध्ये उपलब्ध असल्यामुळे बीअर सोबत बाळगता येते, कुठेही हवी तेव्हा प्राशन करता येते. त्यामुळे तिला तरुणाईची अधिक पसंती आहे. त्याच प्रमाणे फन ड्रिंक म्हणून तिला मिळत असलेली मान्यतादेखील यामागे कारणीभूत आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Thanekar's Dhosali 15 crores liters beer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.