बुधवारी ठाण्याचा पाणीपुरवठा बंद

By Admin | Updated: January 13, 2015 00:40 IST2015-01-13T00:40:25+5:302015-01-13T00:40:25+5:30

उल्हास नदी पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कळवा लघुपाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याने स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद

Thane water supply stop on Wednesday | बुधवारी ठाण्याचा पाणीपुरवठा बंद

बुधवारी ठाण्याचा पाणीपुरवठा बंद

ठाणे : उल्हास नदी पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कळवा लघुपाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याने स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत मनपाच्या स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, समतानगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, घोडबंदर, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, पवारनगर, खारटन रोड, महागिरी, साकेत आदी भागांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thane water supply stop on Wednesday