ठाणे पोलीस होणार दस हजारी

By Admin | Updated: June 9, 2014 01:50 IST2014-06-09T01:50:18+5:302014-06-09T01:50:18+5:30

वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी त्या तुलनेत ठाणे पोलिसांचे संख्याबळ हे अपुरे पडत असून, आता ही समस्या काही अंशी तरी दूर होणार आहे.

Thane police will get ten thousand rupees | ठाणे पोलीस होणार दस हजारी

ठाणे पोलीस होणार दस हजारी

जितेंद्र कालेकर ठाणे
वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी त्या तुलनेत ठाणे पोलिसांचे संख्याबळ हे अपुरे पडत असून, आता ही समस्या काही अंशी तरी दूर होणार आहे. सध्याच्या आठ हजारांच्या पोलिसांच्या संख्याबळात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन ती थेट दहा हजारांच्या घरात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याबाबतचा प्रस्तावही अलीकडेच पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी पाठविला होता. त्याला राज्याच्या गृहविभागाने मंजुरी दिली आहे. सध्या ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी निजामपूर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या चार महापालिकांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट ही पाच परिमंडळे असून, या प्रत्येक परिमंडळात एक असे पाच उपायुक्त आहेत.

Web Title: Thane police will get ten thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.